कोरोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

तेलंगणामधील  कोरोना लस घेतलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मात्र राज्य  सरकारने  या कर्मचाऱ्याचा  मृत्यू   हा  कोरोना  लसीमुळे  झाला  नसल्याचा  दावा केला  आहे.

 हैद्राबाद: देशभरात  कोरोना  लसीकरणाला  सुरुवात  झाल्यानंतर  कोरोनाची  लस पहिल्या टप्प्यात  आरोग्य  कर्मचारी आणि  कोरोना  योद्ध्यांना  देण्यात आली. तेलंगणामधील  कोरोना लस घेतलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मात्र राज्य  सरकारने  या कर्मचाऱ्याचा  मृत्यू   हा  कोरोना  लसीमुळे  झाला  नसल्याचा  दावा केला  आहे.

आता पाकिस्तानलाही भारतीय  कोरोना लसीची अपेक्षा 

तेलंगणामधील सार्वजनिक आरोग्य  विभागातील  अधिकाऱ्यांनी  दिलेल्या माहितीनुसार, ''19  जानेवारीला  या  आरोग्य कर्मचाऱ्याला  कोरोनाची  लस  देण्यात  आली होती.मात्र दुसऱ्या  दिवशी  अचानक  त्याच्या  पोटात  दुखु  लागल्यानंतर  त्याला  पहाटेच्या सुमारास  रुग्णालयात  दाखल  करण्यात  आले, दरम्यान  त्याचा मृत्यू  झाला''.

आत्तापर्यंत  आरोग्य  कर्मचाऱ्याचा   मृत्यू   होण्याची  तिसरी  घटना  आहे. कोरोना  लस घेतल्यानंतर  यापूर्वी  दोन  मृत्यू   झाले  आहेत. पहिलाी  घटना  उत्तरप्रदेशातील  मुरादाबाद  मधील सरकारी  रुग्णालयात  झाली.तर  दुसरी  घटना  कर्नाटकातील  बेल्लारीतील  मधील  सरकारी  रुग्णालयात  झाली  होती.  

संबंधित बातम्या