देशातील वेगेवगेळ्या राज्यांत पुन्हा शाळा बंदचा निर्णय

देशातील वेगेवगेळ्या राज्यांत पुन्हा शाळा बंदचा निर्णय
school close.jpg

देशातील कोरोनाच्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, अनेक राज्यांनी हे संक्रमण वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात संक्रमित लोकांची एकूण संख्या 1 कोटी 21 लाख 49 हजार 335 पेक्षा जास्त झाली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात यांच्यासह अनेक राज्यांनी शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (Decision to close schools again in different states across the country)

पंजाबमध्ये राज्य सरकारने आधीच जारी केलेल्या निर्बंध 10 एप्रिलपर्यंत वाढवले आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकारनेही 4 एप्रिलपर्यंत शाळा बंद (School Close) ठेवण्याचा निर्णय  8 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. कोविड -19 प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील इतर शैक्षणिक संस्था उघडल्या जातील. तर मध्य प्रदेशात पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग 15 एप्रिलपर्यंत ऑफलाइन (offline) वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर राज्यांची परिस्थिती काय आहे. इतर राज्यांची परिथिती देखील गंभीर असल्याचे समजते आहे. दरम्यान उत्तरप्रदेश मध्ये देखील योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 4 एप्रिल पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

पंजाब मध्ये या आधी 30 मार्च  पर्यंत शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याच अनिर्णय घेण्यात आलेला होता, तो आता 10 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. मध्यप्रदेश शिक्षण विभागाचे सेक्रेटरी संजय गोयल यांनी मध्यप्रदेश मधील आठवी पर्यन्तच्या सर्व शाळा 15 एप्रिल पर्यंत बंद राहणार  असल्याचे सांगितळे आहे. तर गुजरातच्या अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट, जामनगर, जूनागढ़, भावनगर आणि राजधानी गांधीनगर या आठ नगरपालिका क्षेत्रांमध्ये फक्त नववी आणि अकरावीच्या वर्गांना कोरोना प्रतिबंधक सर्व अटी  आणि शर्थी पळून वर्ग भरवण्याची परवानगी दिली आहे. दिल्ली सरकारने सुद्धा पुढील निर्णय येईपर्यंत शाळा बंद राहणार असून, ऑनलाईन वर्ग घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com