टीआरपी स्थगितीचा निर्णय योग्यच : एनबीए

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

वृत्त वाहिन्यांचे दर आठवड्याला प्रसिद्ध केला जाणारा ‘टीआरपी’ तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्याचा ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचा (बार्क) निर्णय धाडसी असल्याचे सांगत न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने (एनबीए) याचे स्वागत केले.

नवी दिल्ली : वृत्त वाहिन्यांचे दर आठवड्याला प्रसिद्ध केला जाणारा ‘टीआरपी’ तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्याचा ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचा (बार्क) निर्णय धाडसी असल्याचे सांगत न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने (एनबीए) याचे स्वागत केले. रेटिंगबाबच्या माहितीची विश्‍वासार्हता जपण्यासाठी ‘बार्क’ने आपल्या पद्धतीत अमूलाग्र बदल करावा, अशी विनंतीही करण्यात आली. 

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ‘बार्क’ने महत्त्वाचा निर्णय घेताना बारा आठवडे रेटिंग जाहीर करणार नसल्याचे सांगितले. ‘टीआरपी’ मोजण्याची सध्याच्या पद्धतीचा फेरआढावा घेऊन सुधारणेसाठी या काळात प्रयत्न केले जातील. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार असून हिंदीसह सर्व भाषांमधील वृत्त वाहिन्यांचा टीआरपी पुढील काही आठवडे मोजला जाणार नाही. हा निर्णय योग्य दिशेकडे नेणारा असल्याचे सांगत ‘एनबीए’ने त्याचे स्वागत केले आहे.

संबंधित बातम्या