Agneepath योजनेच्या विरोधात बिहारमध्ये 'भारत बंद'ची घोषणा

केंद्र सरकारने सैन्यात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून तीव्र विरोध दर्शवण्यात येत आहे.
Bharat Bandh News | Agneepath Scheme News
Bharat Bandh News | Agneepath Scheme NewsDainik Gomantak

केंद्र सरकारने (Central Government) सैन्यात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून तीव्र विरोध दर्शवण्यात येत आहे. त्याचवेळी, अनेक राज्यांमध्ये सुरू असलेली निदर्शनेही हिंसक होताना दिसून येत आहेत. आंदोलक आणि विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिल्यानंतर सध्या बिहारमध्ये भारत बंदची हाक देण्यात आली. याबाबत देशातील अनेक राज्यांतील प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. (Bharat Bandh)

Bharat Bandh News | Agneepath Scheme News
कुपवाडा येथे आणखी 2 दहशतवादी ठार, 18 तासांत 3 चकमकी

तर सध्या देशभरात अग्निपथ योजनेचा विरोध थांबण्याचे नाव घेत नाहीये. अनेक राज्यांमध्ये हजारो तरुण या योजनेला विरोध करताना दिसून येत आहेत. अग्निपथ योजनेबाबत रविवारी तिन्ही सेनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. ज्यामध्ये अग्निपथ योजनेचे फायदे सांगण्यात आले आहेत. त्यामुळे आता आंदोलन करणाऱ्या तरुणांनी सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे.

भारत बंदमुळे पंजाब पोलीस सतर्क

सैन्य भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सोमवारी होणाऱ्या संभाव्य भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. यासोबतच पंजाबमधील सर्व प्रमुख लष्करी प्रशिक्षण संस्थांभोवती सुरक्षा वाढवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

हरियाणात कडेकोट सुरक्षा व्यवस्था

यासोबतच हरियाणामध्येही लष्कराच्या अग्निपथ योजनेला विरोध होत असताना भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत फरिदाबाद पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित सर्व तयारी पूर्ण केली. सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आज फरिदाबादमध्ये 2 हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Bharat Bandh News | Agneepath Scheme News
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर

झारखंडमध्ये शाळा बंद राहणार आहेत

अग्निपथ योजनेला झालेल्या विरोधाचा नकारात्मक परिणाम मध्य भारतातही दिसून आला आहे. तरुणांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये सोमवारी सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झारखंडच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने झारखंडमधील सर्व शाळा सोमवारी बंद असणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com