कोरोनाचा उतरता कल सुरू

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

गेले तीन-चार महिने देशात पुन्हा हाहाकार उडवणाऱ्या कोरोनाच्या साथीने सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय उतरता कल दिसण्यास सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली: गेले तीन-चार महिने देशात पुन्हा हाहाकार उडवणाऱ्या कोरोनाच्या साथीने सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय उतरता कल दिसण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवी रूग्णसंख्या ३२, ९८१ वरून घसरून २६५६७ झाली. 

ऑगस्टनंतर देशात विशेषतः दिल्ली व महाराष्ट्रासह सहा राज्यांत या जीवघेण्या कोरोनाची नवी लाट आली होती ती आता ओसरणे सुरू झाल्याचे चित्र आहे. 

आरोग्य मंत्रालयानुसार देशातील एकूण रूग्णसंख्या ९७ लाख ०३ हजार ७७० झाली आहे. कोरोनाबळींचा आकडा १ लाख ४० हजार ९५८ वर पोचला आहे. २० जुलैनंतर म्हणजे तब्बल १४० दिवसांनी प्रथमच देशातील एकूण दैनंदिन रूग्णसंख्या ४ लाखांच्या खाली म्हणजे ३ लाख ८३ हजार ८६६ वर पोहोचली. 

आणखी वाचा:

गोव्यातील ‘ईएसआय’मध्ये एकच, तर जिल्हा इस्पितळात ५७ रुग्ण -

कोरोनाचा कहर 

  • ७ ऑगस्ट ः २० लाखांपेक्षा जास्त 
  • २३ ऑगस्ट ३० लाख 
  • ५ सप्टेंबर : ४० लाख 
  • १६ सप्टेंबर ५० लाख 
  • २८ सप्टेंबर ६० लाख 
  • ११ ऑक्‍टोबर ७० लाख 
  • २९ ऑक्‍टोबर ८० लाख 
  • २० नोव्हेंबर ९० लाखांच्या वर

संबंधित बातम्या