ऑक्सिजन मागणीत घट; उद्योगांसाठी वापरावरील बंदी उठविण्याची शक्यता

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 मे 2021

देशात(INDIA) कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे(corona second wave) रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची(Oxygen) मागणीही कमी झाली आहे.

नवी दिल्ली: देशात(INDIA) कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे(corona second wave) रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. Decrease oxygen demandयामुळे काही प्राधान्य उद्योगांसाठी ऑक्सिजनच्या वापरावरील बंदी उठविण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. येत्या 2-3 दिवसांत यावर निर्णय होऊ शकतो, असे एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. काही प्राधान्य उद्योगांना पुढच्या 2-3 दिवसांत ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. स्टील तयार करणे, रसायने, औषध, पेट्रोलियम प्रक्रिया आणि कागद उत्पादन या क्षेत्रांमध्ये द्रव ऑक्सिजनचा वापर केला जातो.(Decrease oxygen demand Possibility of lifting the ban on the use of oxygen for industries)

25 एप्रिल रोजी उद्योगांसाठी ऑक्सिजनच्या वापरावरील बंदी घालण्यात आली होती, कारण त्यावेळी कोरोनाच्या अधिक रुग्णांना अधिक ऑक्सिजन पुरविणे आवश्यक होते. या कारणास्तव, 25 एप्रिल आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोणत्याही वैद्यकीय हेतूशिवाय द्रव ऑक्सिजनच्या वापरास केंद्र सरकारने बंदी घातली. त्याचबरोबर सरकारने ऑक्सिजन उत्पादकांना त्यांचे उत्पादन जास्तीत जास्त पातळीवर वाढवण्याचे आदेशही दिले होते.

मॉन्सूनच्या गतीला थोडासा ब्रेक, 3 जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता 

असे उत्पादन वाढले

  1. सामान्य काळात देशात दररोज 900 दशलक्ष टन ऑक्सिजन तयार होत होते.
  2. कोरोना साथीच्या आजारामुळे दररोज ऑक्सिजनच्या उत्पादनात 10 पट वाढ झाली.
  3. आता देशात सध्या दररोज 9500 दशलक्ष टन ऑक्सिजन तयार होत आहे.

ऑक्सिजन निर्मिती कंपन्‍यांना दहा टक्के अतिरिक्त कर्जपुरवठा

दरम्यान, केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने देशातील विविध आस्थापनांना ऑक्सिजन उत्पादनासाठी देण्यात येणाऱ्या कर्जात दहा टक्के वाढ करतानाच ऑक्सिजन उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले आहे. ‘एमएसएमई’ व ‘असोचेम’ यांच्यातर्फे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. अर्थमंत्रालयाचे आभार मानण्यात आले आहेत. ‘असोचेम’ चे कौन्सिल अध्यक्ष मांगिरीश पै रायकर यांनी याबाबत बोलताना सांगितले, की इमजेर्न्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम जी ऑक्सिजन व इतर उत्पादनासाठी देशात आहे. या योजनेखाली  कर्जात दहा टक्के वाढ करण्यात आलेले आहे.(Decrease oxygen demand Possibility of lifting the ban on the use of oxygen for industries)

सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यात 10 कोटी कोविशील्डचे डोस मिळतील; केंद्राला पत्र 

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळामध्ये देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. ही गरज लक्षात घेऊन अर्थ मंत्रालयाने या योजनेखालील 10 टक्के वाढ केली.  त्याचा लाभ  देशाबरोबरच गोव्यातील जे उद्योजक ऑक्सिजनचे उत्पादन करत आहेत, त्यांना मिळणार आहे. सध्याच्या काळामध्ये कामगार मिळणे मुश्कील झाले आहे, त्याचबरोबर कच्चा माल ही मिळणे कठीण झाले असून उद्योजकांना नुकसान सोसावे लागत आहे. अशा स्थितीत अर्थमंत्र्यांनी उद्योजकांना दिलासा देण्याचे काम केल्याचे मांगिरीश पै रायकर यांनी सांगितले. तसेच उद्योगांसाठी आवश्‍‍यक परवाने घ्यावे लागतात त्यांचे नूतनीकरण शुल्क सरकारने माफ करावे, अशी मागणी रायकर यांनी केली.

 

संबंधित बातम्या