लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी दीप सिद्धूचा मृत्यू

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
Deep Sidhu
Deep Sidhu Dainik Gomantak

पंजाबी चित्रपट अभिनेता आणि 26 जानेवारीच्या हिंसाचार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या दीप सिद्धूचा मंगळवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. कुंडली मानेसर द्रुतगती मार्गावर रात्री 9.30 वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर दीप सिद्धला (Deep Sidhu) रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दीप सिद्धूची कार ट्रेलरला धडकल्याचं बोललं जात आहे. (Deep Sidhu the main accused in the Red Fort violence case, died)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर दीप सिद्धला रुग्णालयात घेऊन गेले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दीप सिद्धूची कार ट्रेलरला धडकल्याचं बोललं जात आहे. दीप सिद्धू दिल्लीहून (Delhi) भटिंडाकडे जात असताना हा अपघात झाला.

Deep Sidhu
Punjab Election 2022: 'केजरीवालांना संधी दिल्यास पंजाब जाळतील'

दरम्यान, लाल किल्ल्यावरील हिंसाचारात पोलिसांनी (Police) एकूण 17 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये दीप सिद्धू हा मुख्य आरोपी होता. लाल किल्ल्यावर जमावास भडकवल्याचा आणि लाल किल्ल्यावर तिरंगा काढून निशाण साहिब फडकवल्याचा आरोप त्याच्यावर होता. 26 जानेवारी 2021 रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात UAPA आणि इतर अनेक कलमांखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावेळी दिल्ली पोलिसांनी (Police) सिद्धूच्या अटकेवर एक लाखाचे बक्षीस ठेवले होते. दीपला दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी 2021 मध्ये अटक केली होती. यानंतर, एप्रिल 2021 मध्ये, त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com