आमच्या हद्दीत घुसाल तर याद राखा, राजनाथ सिंहांचा चीन पाकिस्तानला इशारा

भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही. देशाने कोणत्याही परकीय भूमीचा ताबा घेतला नाही असे सांगत राजनाथ सिंह यांनी
Defense minister Rajnath Singh warns China & Pakistan on LOC
Defense minister Rajnath Singh warns China & Pakistan on LOC Dainik Gomantak

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajanath Singh) यांनी पाकिस्तानला (Pakistan) जोरदार फटकारले आहे. पाकिस्तानने आपल्या कृत्यांमध्ये सुधारणा करावी, अन्यथा त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशा कडक शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला एक प्रकारचा इशारा दिला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून त्यांनी देशात सामरिक महत्त्वासाठी केलेल्या कामांची माहितीही जनतेला दिली आहे. 'गेल्या साडेसात वर्षांत उत्तराखंडसह संपूर्ण देशात रेल्वे-रस्ते आणि हवाई संपर्काच्या बाबतीत ऐतिहासिक काम झाले असल्याचे वक्त्याव त्यांनी केले आहे. (Defense minister Rajnath Singh warns China & Pakistan on LOC)

तसेच त्यांनी भारत आणि नेपाळमध्ये भाकरी,मुलगी तसेच लष्करी संबंध देखील असल्याचे सांगितले आहे. नुकतेच, नेपाळचे लष्करप्रमुख जनरल प्रभुराम शर्मा भारतात आले होते, तेव्हा त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी 'भारतीय लष्कराचे जनरल' हा मानद दर्जा बहाल केला होता. त्यातून दोन्ही देशांमधील संबंध दिसून येतात.अशी आठवण राजनाथ सिंह यांनी करून दिली आहे.

त्याचबरोबर राजनाथ सिंह यांनी भारत आणि चीन सीमेवर देखील विधान केले आहे. सध्या अरुणाचल प्रदेशातील LAC च्या सहा किलोमीटर परिसरात चीनने बांधल्या जात असलेल्या 60 इमारतींच्या उपग्रह प्रतिमा समोर आल्यानंतर विस्तारवादी चीनच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.हे प्रकरण समोर आल्यानंतर चीनचे मोदी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत.असे बोलले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विट करून या प्रकरणावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, आता चीनच्या कब्जाचे सत्यही स्वीकारले पाहिजे.यावर बोलताना त्यांनी भारताला आपल्या शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध हवे आहेत. त्याचबरोबर भारताची एक इंचही जमीन बळकावण्याचा प्रयत्न कोणत्याही देशाने केला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे भाजपच्या वरिष्ठांनीही देशाच्या धोरणाबाबत शेजाऱ्यांशी चर्चा करून कोणाच्याही क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा आमचा हेतू नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Defense minister Rajnath Singh warns China & Pakistan on LOC
सिध्दू पाकिस्तानचे कौतुक करु शकतात तर...

भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही. देशाने कोणत्याही परकीय भूमीचा ताबा घेतला नाही. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ही भारताची संस्कृती आहे, पण काही लोकांना ते समजत नाही. चीनचे नाव न घेता ते म्हणाले की, मला माहीत नाही, ही त्यांची सवय आहे की स्वभाव. पाकिस्तानचे नाव घेत ते म्हणाले की, ते दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना कडक संदेश देण्यात आला आहे.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही पश्चिम सीमेवरील आमच्या शेजाऱ्याला स्पष्ट संदेश दिला आहे. जर त्यांनी सीमा ओलांडली तर आम्ही केवळ सीमेवरच प्रत्युत्तर देणार नाही तर त्याच्या हद्दीतही प्रवेश करू. आम्ही तिथे सर्जिकल स्ट्राइक करू आणि हवाई हल्ले करूअसा थेट इशारा त्यांनी चीनला आणि पाकिस्तानला दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com