Defence Ministry: संरक्षण मंत्रालयात 10वी पास उमेदवारांना संधी

Defence Ministry भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात जारी झाल्यापासून 45 दिवस आहे.
Defense Ministry Recruitment Opportunity for 10th pass candidates
Defense Ministry Recruitment Opportunity for 10th pass candidates Dainik Gomantak

नवी दिल्ली: संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत निवड केंद्र दक्षिण, बंगलोर येथे गट C नागरी पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीची जाहिरात 13 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत रोजगार वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. नोटीसनुसार, संरक्षण मंत्रालयात गट क अंतर्गत मेसेंजर, वॉचमन, सफाईवाला, मेस वेटर, रूम ऑर्डरली, मसालची या पदांसाठी भरती होणार आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात जारी झाल्यापासून 45 दिवस आहे. अर्ज ऑफलाइन म्हणजेच स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टाने करावा लागेल. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे- कमांडंट, सिलेक्शन सेंटर साउथ, कब्बन रोड, बंगलोर-560042, कर्नाटक.

वयोमर्यादा

या पदांच्या भरतीसाठी उमेदवार किमान 10वी पास असावा. आणि त्याचे कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. नोटीसनुसार, मेसेंजरच्या पदासाठी 2 जागा रिक्त आहेत. चौकीदार पदासाठी एक तर संरक्षण मंत्रालयामध्ये गट क श्रेणीच्या पदांवर भरती केली जाणार आहे.

Defense Ministry Recruitment Opportunity for 10th pass candidates
गोवा आर्ट अँड कल्चर विभागाचा निकाल जाहीर

वेतनश्रेणी

ही भरती झाल्यानंतर उमेदवारांना लेव्हल-1 म्हणजे 18000/- ते 56900/- प्रति महिना वेतन मिळेल. नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्यांना एकापेक्षा जास्त पत्नी किंवा पती आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com