
"Dek raha hai na binod," memes flooded Twitter (X) as the iPhone 15 launched:
येत्या 22 सप्टेंबरपासून, Apple च्या नव्या iPhone 15 Series ची विक्री सुरू होणार आहे. यंदा कंपनीने फोनमध्ये कोणतेही विशेष बदल दिसले, ज्यामुळे आयफोन प्रेमींमध्ये निराशा दिसत आहे. नुकतेच "वंडर लस्ट" इव्हेंटमध्ये ऍपल वॉच सिरीज आणि एअरपॉड्स प्रो सोबत चार नवीन आयफोन लाँच करण्यात आले आहेत.
या नव्या फोन्सवर नाराज असलेल्या अनेकांनी याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळत आहे.
iPhone 15 आणि Apple इव्हेंट बुधवारी सकाळपासून मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. सोशल मीडिया यूजर्स भारतातील फोनची किंमत, त्याची वैशिष्ट्ये आणि आयफोनच्या नवीन मॉडेल्समधील यूएसबी टाइप-सी तंत्रज्ञानाबद्दल बरीच चर्चा करत आहेत.
यामध्ये Apple ने यूएसबी-सी चार्जिंग तंत्रज्ञान उशिरा स्वीकारल्याबद्दल अनेक यूजर्सनी उपहासात्मक कमेंट्स केल्या आहेत, तर काहींनी असे मीम्स तयार केले आहेत की ते पाहूण आणि वाचून तुम्ही हसू रोखू शकणार नाही.
आणि हो, काही युजर्सनी कंपनीचे सीईओ टिम कुक यांचे जुने व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. याशिवाय आयफोन मॉडेलमध्ये कोणताही बदल न झाल्याबद्दल अनेक युजर्सनी त्यांची व्यथा मीम्सच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
यावेळी iPhone 15 चे चार्जिंग स्लॉट iPhone 14 सारखेच असल्याने एक यूजर म्हणाला, "कैसे iPhone 14 का चार्जिंग स्लॉट चेंज कर के iPhone 15 के नाम से बेचा जा रहा है."
हे ट्विट करताना यूजरने 'पंचायत' वेब सीरीजमधील प्रसिद्ध संवाद "देख रहा है ना बिनोद" याचा फोटो अपलोड केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.