भारतीय व्हेरियंटच्या पोस्ट हटवा; सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना आदेश

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 मे 2021

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने(Ministry of Electronics and Information Technology) सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या(Social Media) प्लॅ़फॉर्मवरून कोरोना विषाणूच्या भारतीय वेरियंट(Indian variants) च्या बातम्या किंवा पोस्ट काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने(Ministry of Electronics and Information Technology) सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या(Social Media) प्लॅ़फॉर्मवरून कोरोना विषाणूच्या भारतीय वेरियंट(Indian variants) च्या बातम्या किंवा पोस्ट काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. सुत्रांनी या आदेशाबद्दल माहिती दिली आहे. 11 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा B. 1.617 हा प्रकार प्रथमच भारतात आढळला आहे आणि तो जागतिक चिंतेचा विषय बनू शकतो.(Delete posts of Indian variant Government orders social media companies)

सरकारने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना एक पत्र लिहिले आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, मीडिया रिपोर्टमध्ये B. 1.617 ला कोणताही आधार किंवा तथ्य नसताना भारतीय वेरियंट म्हणून शेअर केले गेले आहे. आयटी मंत्रालयाने सर्व कंपन्यांना त्यांच्या व्यासपीठावरून सर्व बातम्या आणि पोस्ट हटवण्यास सांगितले आहे ज्यात कोरोनातील B. 1.617 वेरियंटला भारतीय वेरियंट म्हटले आहे.

Yass Cyclone: ओडिसातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा 

B. 1.617 हा कोरोनाचा नवा प्रकार आहे पण त्याला भारतीय म्हणणे योग्य नाही. B. 1.617  ला भारतीय वेरियंट म्हटले जाणे पूर्णपणे चुकीचे आहे असे या पत्रात म्हटले गेले आहे. जरी हे पत्र सार्वजनिक केले गेले नाही तरी डब्ल्यूएचओनेही या वेरियंटला भारतीय असल्याचे म्हटले नाही.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की हे पत्र सोशल मीडिया कंपन्यांना पाठविण्यात आले आहे. आणि या पत्रात दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हायला पाहिजे असेही सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या कोणत्याही प्रकाराला कोणत्याही आधर किंवा पुराव्याशिवाय भारतीय असल्याचे संबोधने हे देशाची प्रतिमा घालवण्यासारखे आहे. सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्ट आणि बातम्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे.

ब्लॅक फंगस पेक्षा व्हाईट फंगस अधिक जीवघेणा? वाचा सविस्तर          

त्याच वेळी, मोठ्या सोशल मीडिया कंपनीच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, एकाच प्लॅटफॉर्महून एकाच वेळी हजारो लाखो पोस्ट काढून टाकणे खूप कठीण काम आहे. आधीच भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे बरेच नुकसान झाले आहे. दररोज सुमारे 2,50,000 नव्या कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत, तर रोज सुमारे 4,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. विकिपीडियावर सुद्धा LINEAGE B. 1.617 नावाचे पेज तयार केले गेले आहे, ज्यामध्ये B. 1.617 चे वर्णन कोरोनाचे नवीन रूप म्हणून केले आहे. विकिपीडियाच्या मते, B.1.617 कोरोनाचे नवे रूप आहे, ज्याची ओळख भारतात 5ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात झाली होती.

संबंधित बातम्या