Delhi Acid Attack: 'या नराधमांना सर्वांसमोर फाशी देण्याची गरज...,' गौतम गंभीर भडकला

Acid Attack Case: दिल्लीतील द्वारका मेट्रो स्थानकाजवळ बुधवारी (14 डिसेंबर) दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी 17 वर्षीय तरुणीवर अॅसिड फेकले.
Gautam Gambhir
Gautam GambhirDainik Gomantak

Acid Attack Case: दिल्लीतील द्वारका मेट्रो स्थानकाजवळ बुधवारी (14 डिसेंबर) दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी 17 वर्षीय तरुणीवर अ‍ॅसिड फेकले. याप्रकरणी आता भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांनी सार्वजनिकपणे आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. माजी क्रिकेटपटू आणि संसदपटू गौतम गंभीर म्हणाले की, 'विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड फेकणाऱ्यांना सर्वांसमोर फाशी द्यावी.'

दरम्यान, गौतमने ट्विट करत म्हटले की, "शब्द न्याय देऊ शकत नाहीत. आपल्याला अशा नराधमांमध्ये भीती निर्माण करावी लागेल. द्वारकामध्ये एका शाळकरी मुलीवर अॅसिड फेकणाऱ्या आरोपींना सर्वांसमोर फाशी देण्याची गरज आहे." दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम दिल्लीतील उत्तम नगरजवळील मोहन गार्डनमध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी एका शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड फेकले.

Gautam Gambhir
Delhi Acid Attack: दिल्ली पुन्हा हादरली! 17 वर्षीय मुलीवर फेकले अ‍ॅसिड...

मुलगी सफदरजंगमध्ये दाखल

तरुणीला दिल्लीतील (Delhi) सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल ठीक असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. पोलीस उपायुक्त (द्वारका) हर्षवर्धन मांडवा यांनी सांगितले की, जखमी मुलीने तिच्या ओळखीच्या दोन व्यक्तींवर संशय व्यक्त केल्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीची आम्ही चौकशी करत आहोत. पुढील तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com