दिल्ली महापालिकांसाठी भाजपही ‘अण्णा’ शरण!

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारविरूद्ध भाजपतर्फे चालू असलेल्या जनआंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे साकडे दिल्ली भाजपने हजारे यांना घातले आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारविरूद्ध भाजपतर्फे चालू असलेल्या जनआंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे साकडे दिल्ली भाजपने हजारे यांना घातले आहे.

 भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी खुद्द हजारे यांनाच तशी विनंती केली आहे. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या भाजपने आता २०२२ मधील महापालिकांच्या निवडणुकीसाठी जोर लावला आहे. २०११ च्या आंदोलनामुले तत्कालीन ‘यूपीए’ सरकारविरूद्ध मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यातूनच  निर्माण झालेल्या ‘आप’ ला दिल्लीकरांनी सलग तीनदा घवघवीत यश दिले. मात्र नंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल हजारे यांचे मत प्रतिकूल झाले. त्यांनी राजकारणात जायला नको होते असे हजारे यांचे मत आहे. 

संबंधित बातम्या