दिल्लीत ऑटो-टॅक्सी चालकांची संपाची घोषणा, प्रवासी संतप्त

दिल्लीत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे
delhi cab drivers on strike demand for increase in rent
delhi cab drivers on strike demand for increase in rentDainik Gomantak

दिल्लीत आज म्हणजेच सोमवारी ओला, उबेरच्या टॅक्सी, ऑटो आणि कॅब चालकांनी संपाची घोषणा केली आहे. अशा स्थितीत राजधानीत टॅक्सी, ऑटो, मिनीबस, ओला आणि उबर कॅब जाग्यावर ऊभ्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (delhi cab drivers on strike demand for increase in rent)

delhi cab drivers on strike demand for increase in rent
delhi cab drivers on strike demand for increase in rentDainik Gomantak

देशात यापूर्वी पेट्रोल, डिझेल (Diesel) आणि सीएनजीच्या (CNG) किमती सातत्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत टॅक्सी भाडे वाढवण्याची मागणी कॅब चालकांकडून होत आहे.

दिल्लीत ऑटो टॅक्सी युनियनच्या संपादरम्यान, चालक हातात मागण्यांचे पोस्टर घेऊन दिसले. यावेळी चालकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. इतकंच नाही तर ज्या प्रवाशांना त्रास होतोय त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, मात्र असं न केल्यास आमचं जगणं कठीण होईल, असं चालकांनी सांगितलं.

delhi cab drivers on strike demand for increase in rent
delhi cab drivers on strike demand for increase in rentDainik Gomantak

नवी दिल्ली (Delhi) रेल्वे स्थानकावर देशाच्या विविध भागातून प्रवासी येत आहेत, मात्र त्यांना स्थानकाबाहेर एकही ऑटो टॅक्सी मिळत नाही. त्यांना दिल्लीच्या विविध भागात जावे लागते. मात्र बराच वेळ प्रतीक्षा करूनही त्यांना वाहन मिळत नाही.

delhi cab drivers on strike demand for increase in rent
delhi cab drivers on strike demand for increase in rentDainik Gomantak

अनेक संस्था एकत्र आल्या

केवळ दिल्लीतच नाही तर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत टॅक्सी भाडे वाढवण्याच्या मागणीसाठी ओला आणि उबरच्या कॅब चालक संघटनेने सोमवारपासून संपाची घोषणा केली आहे. दुसरीकडे दिल्ली ऑटो रिक्षा असोसिएशननेही सीएनजीवर सबसिडी देण्याची मागणी केली आहे. जर सरकारने त्यांची मागणी ऐकली नाही तर ते संपावर जातील, असे संघाचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com