Shraddha Walkar Murder Case: आफताबचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला

दिल्ली न्यायालयाने आफताबच्या पोलीस कोठडीत पुढील ४ दिवसांची वाढ केली
Shraddha Walkar Murder Case
Shraddha Walkar Murder CaseDainik Gomantak

क्रूरतेची सीमा गाठणारे श्रद्धा वालकर हत्याप्रकरण संपूर्ण देशात गाजत आहे. आपली लिव्ह-इन पार्टनर असलेल्या श्रद्धाची हत्या करून, मृतदेहाचे तुकडे करून ते नष्ट करण्याचा निंदनीय प्रकार करणाऱ्या आफताब अमीन पूनावाला या आरोपीला न्यायव्यवस्था कोणती शिक्षा सुनावणार याकडे अख्या देशाचे लक्ष लागून राहिलं आहे. देशाची राजधानी- दिल्ली देखील या क्रूर घटनेने हादरून गेलीय. आफताबने केलेल्या कृत्यानंतर दिल्ली पोलिसांनी अथक प्रयत्नांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक देखील सज्ज केले आहे.

पोलिसांनी तपसादरम्यान आफताब पूनावालाला मेहरौली जंगलात नेले असता आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली होती. आफताबने पोलिसांना सांगितले की, 'येस आय किल्ड हर' म्हणजे होय मी तिला मारले. मात्र या प्रकारानंतर आफताब वेळोवेळी पोलिसांची दिशाभूल करत असून, तो त्याची विधाने वारंवार बदलत आहे, असे तपासकर्त्या पोलिसांचे म्हणणे आहे. आफताबला गुरुवारी दिल्लीतील साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होण्याच्या अर्जाला परवानगी देण्यात आली होती.

Shraddha Walkar Murder Case
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका, केली मोठी मागणी

मंगळवारी दिल्लीतील साकेत न्यायालयाने श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीत पुढील ४ दिवसांची वाढ केली आहे. विशेष सुनावणीत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com