Farmers Protest Toolkit Case : दिशा रवीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंबधित टूलकिट प्रकरणात बेंगलोरची पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला दिल्लीच्या न्यायालयाकडून झटका बसला आहे.

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासंबधित टूलकिट प्रकरणात बेंगलोरची पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला दिल्लीच्या न्यायालयाकडून झटका बसला आहे. दिल्लीतील न्यायालयाने दिशा रवीला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांनी दिशा रवीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी सुनावणीच्या वेळेस केली होती. यावेळेस दिल्ली पोलिसांच्या वकिलांकडून पोलीस दिशा रवीला अन्य आरोपींसह चौकशी करणार असल्याचे सांगितले. यापूर्वी रविवारी 14 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने दिशा रवीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आणि याचा कालावधी आज संपत होता. 

श्रीनगरमध्य़े दहशतवाद्यांनी दोन पोलिसांना गोळ्या घालून केले ठार... घटनेचा...

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर मागील दोन महिन्यांच्या पेक्षा अधिक काळ आंदोलन करत आहेत. आणि याच आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनादिवशी राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर परेडचे आयोजन केले होते. व त्यावेळेस दिल्लीतील काही भागात हिंसेकी घटना घडल्या होत्या. तर यानंतर शेतकरी आंदोलनासंबंधित आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावरील ट्विटर वरून ट्विट केले होते. यामध्ये स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने देखील ट्विटरवर देशातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. आणि त्यानंतर मात्र तिने शेतकरी आंदोलनासंबधित टूलकिट शेअर केले होते. यावर दिल्ली पोलिसांनी बेंगलोर मधील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली होती. दिशावर टूलकिट एडिट करण्यासह अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

भारत आणि चीन यांच्या सैन्यातील चर्चेची दहावी फेरी उद्या पार पडणार 

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर दिशाने सर्व दोष मुंबईतील वकील निकता जेकब आणि पुण्यातील अभियंता शंतनू यांच्यावर ढकलला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी दिली आहे. तसेच दिशा रवी पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देत असून 22 फेब्रुवारी रोजी शंतनुला देखील या चौकशीत सहभागी करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.           

संबंधित बातम्या