New Delhi: धक्कादायक! महिलेवर सामूहिक बलात्कार, 4 रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

Delhi Crime: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
Woman
WomanDainik Gomantak

Delhi Crime News: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8-9 वरील ट्रेन लाइटिंग रुममध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. दोन नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे सांगण्यात आले, तर दोन नराधम बाहेर उभे राहून पहारा देत होते. हे सर्व आरोपी रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाचे कर्मचारी आहेत.

डीसीपी (रेल्वे) हरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21-22 जुलैच्या रात्री 3.27 वाजता घटनेची माहिती मिळाली. पीडीत महिलेने (Woman) दिल्ली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले.

Woman
DSPच्या हत्येनंतर खाणकाम विरोधात आत्मदहन करणाऱ्या संताचा राजस्थानमध्ये जळून मृत्यू

दुसरीकडे, घटनास्थळी 30 वर्षीय पीडितेने सांगितले की, 'मी फरिदाबादची रहिवासी आहे.' 2 वर्षांपूर्वी पीडीत महिलेचा घटस्फोट झाला आहे. एका मित्राच्या माध्यमातून ती एका आरोपीच्या संपर्कात आली होती. आरोपीने (Accused) सांगितले होते की, 'मी रेल्वेत (Railway) काम करत आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com