दिल्ली सरकारचा दारु व्यवसायाला अलविदा

दिल्लीतील सर्व सरकारी दारूची (Alcohol) दुकाने बंद होण्याची ही पहिलीच वेळ असून हा संपूर्ण व्यवसाय खाजगी हातात जाईल.
दिल्ली सरकारचा दारु व्यवसायाला अलविदा
बुधवारी सकाळपासून शहरातील किरकोळ मद्यविक्री दुकानांचे (Alcohol) कामकाज खासगी हातात राहणार आहे.Dainik Gomantak

नवी दिल्ली: दिल्ली सरकार (Government of Delhi) मंगळवारी रात्रीपासून दारु (Alcohol) व्यवसायाला अलविदा म्हणणार आहे. शहरातील जवळपास 600 सरकारी किरकोळ दारूची दुकाने औपचारिकपणे बंद केली आहेत. नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत बुधवारी सकाळपासून शहरातील किरकोळ मद्यविक्री दुकानांचे कामकाज खासगी हातात राहणार आहे.

बुधवारी सकाळपासून शहरातील किरकोळ मद्यविक्री दुकानांचे (Alcohol) कामकाज खासगी हातात राहणार आहे.
दारु पिणाऱ्यामध्ये देशात 'ही' दोन राज्ये अव्वल; जाणून घ्या

बुधवारपासून सर्व 850 खाजगी दुकाने सुरू होतील याची शाश्वती नसल्याने शहरातील दारूची सरकारी किरकोळ दुकाने बंद केल्याने दिल्लीत दारूचा तुटवडा निर्माण होण्याची भीती विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, सर्व 32 झोनमधील अर्जदारांना परवाने देण्यात आले आहेत. परंतु नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार, पहिल्या दिवसापासून सुमारे 300-350 दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे.

बुधवारी सकाळपासून शहरातील किरकोळ मद्यविक्री दुकानांचे (Alcohol) कामकाज खासगी हातात राहणार आहे.
गोवा पोलिसांची मोठी कारवाई; विदेशी बनावटीची दारु जप्त..

सूत्रांनी सांगितले, “सुमारे 350 दुकानांना तात्पुरते परवाने देण्यात आले आहेत. 10 घाऊक परवानाधारकांकडे 200 हून अधिक ब्रँड नोंदणीकृत असून त्यांनी आतापर्यंत विविध ब्रँडची नऊ लाख लिटर दारू खरेदी केली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हळूहळू सर्व 850 दारूची दुकाने सुरू होतील आणि त्यानंतर कोणतीही कमतरता भासणार नाही. दिल्लीतील सर्व सरकारी दारूची दुकाने बंद होण्याची ही पहिलीच वेळ असून हा संपूर्ण व्यवसाय खाजगी हातात जाईल. दिल्ली सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत, सर्व 850 दारूची दुकाने खुल्या निविदेद्वारे खाजगी कंपन्यांना देण्यात आली आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com