CBIला दणका! ओमप्रकाश चौटालांच्या याचिकेवर दिल्ली HCने बजावली नोटीस

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवल्याच्या विरोधात केलेल्या अपीलवर दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस पाठवली आहे.
Delhi High Court
Delhi High CourtDainik Gomantak

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांनी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवल्याच्या विरोधात केलेल्या अपीलवर दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) सीबीआयला नोटीस पाठवली आहे. ओमप्रकाश चौटाला यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. यासोबतच 4 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. (Delhi High Court issues notice to CBI on Omprakash Chautala petition)

Delhi High Court
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्टील मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी 27 मे रोजी ओमप्रकाश चौटाला यांच्या शिक्षेवर निर्णय घेण्यात आला होता. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. एवढेच नाही तर चौटाला यांच्या चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले होते.

न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता,

न्यायालयाने ओमप्रकाश चौटाला यांना कोर्टरूममधूनच ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते आणि अशाप्रकारे चौटाला कोर्टातून थेट तुरुंगात गेले होते. चौटाला यांच्या वतीने या प्रकरणी अपील करण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितली होती, त्यावर न्यायाधीशांनी तुम्ही उच्च न्यायालयात जा, असे ही सांगितले होते. गुरूवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्यांचा निर्णय राखून ठेवला होता.

Delhi High Court
Photo: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत विवाहबद्ध

विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी चौटाला आणि सीबीआयच्या वकिलांच्या शिक्षेवरील युक्तिवाद ऐकला, ज्यांना 1993 ते 2006 या कालावधीत बेहिशोबी मालमत्ता मिळवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. चर्चेदरम्यान ओपी चौटाला यांनी वृद्धापकाळ आणि वैद्यकीय कारणास्तव किमी शिक्षा देण्याची विनंती केली होती. एजन्सीने म्हटले होते की चौटाला यांचा स्वच्छ इतिहास नाहीये आणि त्यांना दोषी ठरवण्यात आलेले हे दुसरे प्रकरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com