दिल्ली हायकोर्ट घेणार 'ऐतिहासीक' निर्णय!

फक्त न्यायव्यवस्थेमध्ये नाही तर देशासाठीही ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.
दिल्ली हायकोर्ट घेणार 'ऐतिहासीक' निर्णय!
Senior Advocate Saurabh KripalDainik Gomantak

भारताच्या इतिहासामध्ये (History of India) न्यायव्यनस्थेत बदल घडताना दिसुन येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं ज्येष्ठ वकिल सौरभ कृपाल (Senior Advocate Saurabh Kripal) यांना दिल्ली हायकोर्टाचे (Delhi High Court) जज बनवण्याची शिफारस केली आहे. केलेल्या शिफारशीवर जर सिक्कामोर्तब झालं तर ज्येष्ठ वकिल पहिले समलैंगिक जज (First gay judge) म्हणुन भारताच्या इतिहासामध्ये त्यांचे नाव लिहीले जाईल. फक्त न्यायव्यवस्थेमध्ये नाही तर देशासाठीही ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.

देशासाठी हा क्षण अविस्मरणीय असणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं एखाद्या गे व्यक्तीला जज करण्याचा पहिल्यांदाच निर्णय घेतला आहे. निर्णय भारतीय समाज व्यवस्थेसाठीही क्रांतीकारक ठरण्याची शक्यता आहे.

Senior Advocate Saurabh Kripal
'पूर्वाचंल एक्सप्रेस वे उत्तरप्रदेशची शान'

सुप्रीम कोर्टाच्या जारी केलेल्या स्टेटमेंट मध्ये असे म्हटले आहे की, 11 नोव्हेंबर रोजी कॉलेजियमने बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीत सौरभ कृपाल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. विशेष म्हणजे माजी सरन्यायधीश एसए बोबडे यांनी केंद्र सरकारकडे कृपाल यांना जज बनवण्यावर विचारणा देखील केली होती. माझ्या प्रश्नांवर केंद्रानं आपलं मत स्पष्ट करावं असही बोबडे म्हणाले. सौरभ कृपाल यांच्या नावाची पहिल्यांदाच शिफारस होतेय असं काही नाही, याआधीही 4 वेळेस विचारविनिमय झाला पण मतभेद उघड झाले. 2017 मध्ये पहिल्यांदा सौरभ कृपाल यांना जज बनवण्याची शिफारस केली गेली होती.

कोण आहेत सौरभ कृपाल? सौरभ कृपाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ऑक्सफर्डमधून त्यांनी लॉ ची डिग्री घेतली,

ऑक्सफर्डमधून लॉ ची डिग्री घेत असताना त्यांनी केंब्रिजमधून लॉमध्येच पोस्ट ग्रॅज्युएट पूर्ण केलं. सौरभ कृपाल यांनी जे महत्वाचे खटले लढले त्यात, 2018 मध्ये जे 377 कलम हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याचे ते वकिल होते. नवतेजसिंह जोहर विरुद्ध भारत सरकारचा देखील समावेश आहे.

कोण आहेत सौरभ कृपाल? सौरभ कृपाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलंय. तर ऑक्सफर्डमधून (Oxford) त्यांनी लॉची डिग्री घेतलीय. लॉमध्येच पोस्ट ग्रॅज्युएट कृपाल यांनी केंब्रिजमधून पूर्ण केलंय. गेल्या दोन दशकापासून ते सुप्रीम कोर्टात प्रॅक्टीस करतायत. यूएनसोबतही कृपाल यांनी जिनेव्हात काम केलंय. सौरभ कृपाल यांनी जे महत्वाचे खटले लढले त्यात नवतेजसिंह जोहर विरुद्ध भारत सरकारचा समावेश आहे. तसच कलम 377 हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याचे ते वकिल होते. 2018 मध्ये हे कलम रद्द केलं.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com