'...मे महिना देणार उष्णतेपासून दिलासा', जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

राजधानी दिल्लीसह इतर भागात येत्या तीन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी वर्तवली आहे.
Sun
SunDainik Gomantak

राजधानी दिल्लीसह इतर भागात येत्या तीन दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी वर्तवली आहे. परंतु एप्रिल महिन्यासारखी तीव्र उष्णतेची शक्यता नसणार आहे. 13 मे पासून तापमानात घट होत आहे. (Delhi IMD forecasts heat wave in next 3 days)

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी म्हणाले, '9 मे पर्यंत दिल्लीचे (Delhi) तापमान गेल्या काही दिवसांपासून 40 ते 42 अंशांच्या आसपास राहिले आहे, त्यामुळे दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत मे महिन्यात आपण उष्णतेच्या लाटेचा फारसा सामना केलेला नाही. 11, 12 आणि 13 मे रोजी दिल्लीत काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते. 11 आणि 12 मे रोजी तापमान 43 ते 44 अंशांच्या दरम्यान पोहोचण्याची भीतीही आहे.'

Sun
'आसानी' चक्रीवादळाने केले रौद्र रूप धारण, या राज्यांना सतर्कतेचा इशारा

ते पुढे म्हणाले की, सध्या दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि यूपीसारख्या उत्तर भारतातील बहुतांश भागात मे महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती नाही. राजस्थानमध्ये तापमान 44 आणि 45 अंशांच्या आसपास राहील. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्ली, हरियाणा (Haryana) आणि पंजाब (Punjab) 13 मे रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सावटाखाली असतील, ज्यामुळे वाढत्या तापमानापासून दिलासा मिळेल.

Sun
Cyclone Yaas: उंच लाटा, वादळी वारा, चक्रीवादळाचे रौद्र रूप व्हिडीओतून आले समोर

याशिवाय, वेस्टर्न डिस्टर्बन्स 13 मेपासून पुढे सरकत आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे पाऊस पडणार नसून दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये तापमान नियंत्रित राहील. 18 मेच्या आसपास आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स पुढे सरकणार आहे, त्यामुळे मे महिन्यात एप्रिलसारखी परिस्थिती अपेक्षित नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com