दिल्ली मेट्रो १ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होण्याचे संकेत

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

दारूचे बार उघडणार नसले तरी त्याच्या बाटल्या विकत घेऊन त्या नेण्यास (टेक अवे सेल) मद्यपींना परवानगी मिळणार आहे. स्थानिक उपनगरी गाड्यांची वाहतूक, एक पडदा सिनेमागृहे, छोट्या क्षमतेची सभागृहे आदींनाही परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली: कोरोनाच्या संकटामुळे गेले पाच महिने ठप्प असलेली ‘दिल्ली मेट्रो’ची वाहतूक एक सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘अनलॉक-४’ मध्ये शारीरिक अंतराचे काटेकोर पालन करत पुन्हा सुरू करण्यास केंद्राकडून हिरवा कंदील दाखविण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र शाळा-महाविद्यालयांसह सर्व शिक्षणसंस्था बंदच राहणार आहेत. 

दारूचे बार उघडणार नसले तरी त्याच्या बाटल्या विकत घेऊन त्या नेण्यास (टेक अवे सेल) मद्यपींना परवानगी मिळणार आहे. स्थानिक उपनगरी गाड्यांची वाहतूक, एक पडदा सिनेमागृहे, छोट्या क्षमतेची सभागृहे आदींनाही परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे कोरोना महामारीतील अनलॉक-४ चे दिशानिर्देश लवकरच घोषित होण्याची शक्‍यता आहे. दिल्ली मेट्रो सुरू करण्यासाठी केंद्रावर मोठा दबाव आला आहे. मेट्रो गेले एक तप लाखो दिल्लीकरांची जीवनवाहिनी झाली आहे. रोज किमान ४८ लाख दिल्लीकर मेट्रोने प्रवास करतात. मात्र कोरोना लॉकडाउन व त्याआधी लागू केलेल्या जनता कर्फ्यूपासून म्हणजे २३ मार्चपासून मेट्रो ठप्प असल्याने मेट्रोला तब्बल १३००-१४०० कोटी रूपयांचा जबर फटका बसला आहे. 

गोमन्तक वृत्तसेवा

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या