चीनच्या मॉडेललाही पराभूत करतेय दिल्ली मॉडेल'; वाचा सविस्तर

arvind kejariwal.jpg
arvind kejariwal.jpg

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत(Delhi)   कोविड-19  (Covid-19) च्या लढाईत  'दिल्ली मॉडेल' (Delhi Model) यशस्वी होताना दिसत आहे. दिल्लीतील कोविड 19 संक्रमणाची संख्या लक्षणीयरित्या कमी होत असून संसर्ग दर 32-34 टक्क्यांवरून घसरून 11-12 टक्क्यांवर आला आहे.   कोविड 19 चे संक्रमण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने तीन आठवड्यांपूर्वी लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू केले होते. त्यानंतर हळूहळू संक्रमणाची संख्याही कमी झाल्याचे दिसून आले आहे.  रोज नव्या संक्रमाणाच्या संख्येत घट होऊन ही संख्या 6430 वर पोहचली आहे. कोविड-19 वर मात करण्यासाठी दिल्ली सरकार ज्या प्रकारे काम करत आहे, ही पाहता दिल्ली लवकरच कोविड 19 ला हरवेल असे दिसत आहे. त्यामुळे देशात आता दिल्ली मॉडेलची चर्चा होऊ लागली आहे.   (The Delhi model also beats the Chinese model. Read more) 

वाचा, काय आहे दिल्ली मॉडेल? 
- रेकॉर्ड बेड क्षमतेत वाढ
कोविड 19  महामारी सुरू झाली तेव्हा दिल्लीत फक्त सहा ते सात हजार बेड उपलब्ध होते. कोरोनाची प्रकरणे जसजशी वाढू लागली तसतसे बेडस कमी पडू लागले.  परंतु दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने या प्रकरणात पुढाकार घेतला आणि आज दिल्लीत 25,608 कोरोना बेड उपलब्ध करून दिले. तिसऱ्या लाटेत 30 हजार नवीन प्रकरणे आली तरी दिल्लीला त्या परिस्थितीचा सामना  करण्यास सक्षम असल्याचे, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटल आहे. 

-चीन मॉडेलवर मात 
कोविड 19 ला  पराभूत करण्यासाठी चीनने जगभरात एक उदाहरण ठेवले आहे. आता वुहानसह चीनच्या सर्व प्रांतांमध्ये जनजीवन सामान्य होऊ लागले आहे. चीनच्या या यशाचे रहस्य त्याच्या शिस्त तसेच कोरोनाशी लढण्याच्या तयारीत स्पष्ट दिसत होते. विक्रमी 10 दिवसात 1000 बेडची क्षमता असलेले एक रुग्णालय उभारून त्यांनी संपूर्ण जगाला आश्चर्य चकित केले होते.   परंतु देशाचा एक छोटासा भाग असलेल्या दिल्लीने  या प्रकरणात चीनलाही पराभूत केले आहे. अत्यंत मर्यादित स्त्रोतांसह, दिल्लीतील डॉक्टर आणि अभियंत्यांनी अवघ्या 15 दिवसात एक हजार खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारले आहे. याठिकाणी कोविड 19 रूग्णांवर येथे उपचार केले जातील. अरविंद केजरीवाल यांनी या रुग्णालयाच्या निर्मितीबद्दल दिल्लीतील डॉक्टर-अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.

- ऑक्सिजन उपलब्धता वाढवली
दिल्लीत ऑक्सिजनचा अभाव ही एक मोठी समस्या बनली होती. पण त्यासाठी दिल्ली सरकारने अनेक स्तरांवर तयारी केली. त्यासाठी केंद्रापासून कायदेशीर लढाईपर्यंत त्यांना संघर्ष करावा लागला. पण या लढाईचा परिणाम असा झाला की आज दिल्लीला आपल्या गरजेपुरता पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. एवढेच नव्हे तर ऑक्सिजनची उपलब्धता नेहमीच सुनिश्चित करण्यासाठी दिल्लीतील बर्‍याच रुग्णालयांमध्ये स्वतःच्या पातळीवर ऑक्सिजनचे उत्पादन सुरू झाले आहे.

- एकात्मिक प्रणाली सज्ज
कोरोनाशी झालेल्या लढाईत कोणत्याही त्रुटी येऊ नयेत यासाठी सरकारने एकात्मिक प्रणाली  तयार केली आहे. या प्रणालीद्वारे दिल्लीतील सर्व रुग्णालयांना एकाच ठिकाणी ऑक्सिजन, रूग्णांना बेडची उपलब्धता, प्रत्येक रूग्णाला ऑक्सिजन, गृह  विलगीकरणात  राहणाऱ्या  सर्व रुग्णांना मदत करणे, आदि सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे दिल्ली सरकारच्या या निर्णयांचे  अत्यंत सकारात्मक परिणाम दिसत आहेत. 

- गरिबांना मदत 
एकीकडे केजरीवाल सरकारने कोविड 19 शी झुंज दिली, दुसरीकडे, गोरगरीब वर्गाला पाठिंबा देण्याची रणनीतीही त्यांनी स्वीकारली  आहे. कोविड 19 मुळे कोणताही गरीब स्थलांतर करू नये यासाठी आतापर्यंत दिल्ली सरकारने सर्व गरीब कुटुंबांना दोन महिने मोफत रेशन, ऑटो रिक्षाचालक आणि बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5000 रुपयांची आर्थिक मदत, अनाथ मुले व वृद्धांना मदत देण्याचे ठरविले आहे. या दरम्यान कोणालाही अन्नाची कमतरता भासू नये, यासाठी सर्व जिल्हा मुख्यालयात तयार अन्नही पुरविले जात आहे.

- आता लॉकडाऊन  हटणार का?
दिल्ली सरकारच्या या योजनांमुळे कोविड 19चा  लढा अधिक मजबूत झाला असून कोविड 19  प्रकरणे हळूहळू कमी होऊ लागली आहेत. त्यामुळे आता सरकारने लॉकडाऊन हटवावे की नाही याबाबत दिल्लीत चर्चा सुरू झाल्या आहेत.  परंतु सध्यातरी राज्य सरकार लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेण्याबाबत सकारात्मक नसल्याचे दिल्लीच्या  सरकारी  अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कोविड 19  प्रकरणे कमी झाली असली तरी अद्याप कोविड 19 मुळे होणारे मृत्यू अद्याप कमी झालेले नाहीत. जोपर्यंत मृत्यूसंख्या कमी होत नाही तोपर्यंत संक्रमणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे  सध्या तरी राज्यात लॉकडाऊन हटविण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com