NCRB: दिल्ली महिलांसाठी सर्वात 'असुरक्षित', जाणून घ्या या मोठ्या शहरांची रॅंकिंग

National Crime Records Bureau: दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीबाबत NCRB चा अहवाल समोर आला आहे.
Delhi Police
Delhi PoliceDainik Gomantak

National Crime Records Bureau: दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीबाबत NCRB चा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार 2021 मध्ये दिल्ली हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर होते. या वर्षी दररोज दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले. 2021 मध्ये दिल्लीत महिलांवरील 13,892 गुन्ह्यांची नोंद झाली, जी 2020 च्या तुलनेत 40% पेक्षा जास्त आहे. 2020 मध्ये हा आकडा 9,782 होता.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील (Delhi) महिलांवरील गुन्ह्यांची प्रकरणे सर्व 19 महानगरांमधील एकूण गुन्ह्यांपैकी 32.20 टक्के आहेत. दिल्लीनंतर राजधानी मुंबई होती. मुंबईत (Mumbai) अशा 5,543 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, बेंगळुरुमध्ये 3,127 प्रकरणे नोंदवली गेली.

Delhi Police
'मुनव्वर फारुकीचा शो रद्द करा नाही तर...', VHP चा दिल्ली पोलिसांना इशारा

दरम्यान, 2021 मध्ये, राष्ट्रीय राजधानीत इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत अपहरण (3948), पतीकडून क्रूरता (4674) आणि मुलीवरील बलात्कार (833) या श्रेणींमध्ये महिलांविरुद्ध सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. 2021 मध्ये दिल्लीत दररोज सरासरी दोन मुलींवर बलात्कार झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.

Delhi Police
दिल्ली HC चा मोठा निर्णय, 'TV अन् Social Media वरील कमेंट अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग'

अहवालानुसार, 2021 मध्ये राष्ट्रीय राजधानीत महिलांवरील (Women) 13,982 गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर सर्व 19 महानगरांमध्ये एकूण गुन्हे 43,414 होते. 2021 मध्ये राजधानीत हुंडाबळी मृत्यूची 136 प्रकरणे नोंदवली गेली, जी 19 महानगरांमधील एकूण मृत्यूच्या 36.26 टक्के आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com