Delhi Oxygen Crisis: केजरीवालांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

दिल्ली दररोज 700 टन ऑक्सिजन वापरते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिले असून पहिल्यांदा दिल्लीला 700 टनांपेक्षा जास्त ऑक्सिजन (Oxygen) दिल्याबद्दल आभार मानले. यासह केजरीवाल म्हणाले की दररोज किमान एवढाच ऑक्सिजन दिल्लीला पुरवावा. दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन दिल्याबद्दल आज सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) केंद्राचे आभार मानले. त्याचबरोबर, केजरीवाल यांचे पत्र समोर आले आहे. (Delhi Oxygen Crisis: Kejriwal thanks PM Modi)

होमिओपॅथीक औषध घेतल्यामुळे एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

दिल्ली दररोज 700 टन ऑक्सिजन वापरते. आम्हाला केंद्र सरकारकडे सतत प्रार्थना केली होती की आम्हाला इतका ऑक्सिजन द्यावा. काल पहिल्यांदाच दिल्लीला 730 टन ऑक्सिजन मिळाला आहे असे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. पुढे त्यांनी लिहिले, मी दिल्लीच्या लोकांकडून आपले मनापासून आभार मानतो. दररोज जास्तीत जास्त ऑक्सिजन दिल्लीला द्यावा अशी विनंती आपल्याला करतो आणि त्यात कोणताही कमतरता भासू देऊ नये. संपूर्ण दिल्ली आपला यासाठी आभारी असेल.

सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये केंद्राने सांगितले की दिल्लीतील 50 हून अधिक बड्या रुग्णालयाचे सर्वेक्षण केले गेले आहे. त्यातून केंद्र सरकारला माहिती मिळाली आहे की रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले गेले आहे. दिल्लीत ऑक्सिजनची कमतरता नाही. तथापि, दिल्लीला दररोज 700 टन ऑक्सिजनपुरवठा करण्यास केंद्र सरकार टाळाटाळ करणार नाही. दिल्लीला एवढे ऑक्सिजन द्यावे लागतील असे कोर्टाने सांगितले, तेव्हा केंद्राने त्यावर उत्तर दिले जर दिल्लीला एवढा ऑक्सिजन पुरवला तर अन्य राज्यांमध्येही कमतरता येईल.

केरळमध्ये 8 मे ते 16 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर

वाटप केवळ कागदावर नसावे, तर त्याचे प्रत्येक्षात वाटप व्हायला पाहिजे असे दिल्ली सरकारने कोर्टात म्हटले आहे. आम्ही आयसीयूच्या रूग्णाला सांगू शकत नाही की केवळ 24 लिटर ऑक्सिजनच त्याला दिले जाऊ शकते कारण केंद्राने 36 लीटर देण्यास नकार दिला आहे.

संबंधित बातम्या