दिल्ली हिंसाचाराबद्दल माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे रोख बक्षीस

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वजारोहण करणार्‍यांना शोधून काढण्यास मदत करणाऱ्यांना आणि त्याची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वजारोहण करणार्‍यांना शोधून काढण्यास मदत करणाऱ्यांना आणि त्याची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. याप्रकरणातील दीप सिद्धू, जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंग यांना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचारात सामील झालेल्या चार व्यक्तींबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी प्रत्येकी 50,000 रुपयांचे रोख बक्षीस देखील जाहीर केले. जजबीर सिंग, बुटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंह अशी त्यांची नावे आहेत.

दरम्यान राजधानीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरूच आहे. निदर्शकांनी प्रामुख्याने गाझीपूर सीमेवर लक्ष केंद्रित केले आहे, परंतु सिंहू आणि टिक्री सीमेवरही मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित आहेत. दिल्ली पोलिस आंदोलक शेतकऱ्यांचा निषेध रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, काटेरी तार, स्पायक्स, लोखंडी खिळे, काँक्रीट बॅरिकेड्स, इंटरनेट बंदी अशा कितीतरी पर्यायांचा वापर दिल्ली पोलिस करत आहेत .

आंदोलन शांततामय असूनही, दिल्ली पोलिसांनी मार्ग बंद केला आहे. दिल्ली पोलिसांनी रस्ते बंद केले आहेत. हे शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप  शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केला आहे.

या राज्यात हुक्का बारवर ब्लँकेट बंदी येण्याची शक्यता -

संबंधित बातम्या