दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, 'हनी ट्रॅप' सिंडिकेटचा केला पर्दाफाश

सिंडिकेटच्या महिला सदस्यांनी फेसबुकवर मैत्री आणि आकर्षक गोष्टी करून श्रीमंत लोकांना भाड्याच्या फ्लॅटमध्ये बोलावले.
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, 'हनी ट्रॅप' सिंडिकेटचा केला पर्दाफाश
Delhi Police cracks down on Honey Trap SyndicateTwitter

दिल्ली: दिल्ली पोलिसांनी एका हनी ट्रॅप सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. सिंडिकेटच्या महिला सदस्यांनी फेसबुकवर मैत्री आणि आकर्षक गोष्टी करून श्रीमंत लोकांना भाड्याच्या फ्लॅटमध्ये बोलावले. तिथे नकली पोलीस बनवून तिथे छापे टाकायचे आणि लोकांकडून मोठी रक्कम उकळायचा व्यवसाय हे लोकं करत होते. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असून, त्यांना पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. लवकरच फरार आरोपींना पकडले जाईल, असा पोलिसांचा दावा आहे.(Delhi Crime)

Delhi Police cracks down on Honey Trap Syndicate
Tarsar Lake Accident: पर्यटकांचा जीव वाचविणाऱ्या गाईडचा मृतदेह सापडला, सर्च ऑपरेशन सुरू

डीसीपी समीर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे पवन उर्फ ​​घनश्याम, मनजीत उर्फ ​​मनदीप आणि दीपक उर्फ ​​नवीन अशी आहेत. हे सर्व हरियाणातील झज्जर आणि रोहतक येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला उपनिरीक्षकाचा गणवेशही जप्त करण्यात आला आहे. डीसीपी म्हणाले की, गाझियाबादचे तक्रारदार अनिल कुमार यांनी पश्चिम विहार पूर्व पोलिस ठाण्यात 1 मे रोजी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी विशेष स्टाफचे निरीक्षक अजमेर यांच्या नेतृत्वाखाली एसआय प्रीतम, एएसआय राकेश, हेड कॉन्स्टेबल प्रवीण आणि इतरांचे पथक तयार करण्यात आले. पोलिस पथकाने सूत्रे सक्रिय करून अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी पोलिसांनी तक्रारदाराकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली.

तीन आरोपी फ्लॅटमध्ये सामान परत घेण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची पुष्टी केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने पश्चिम विहारमधील ज्वाला हेरी मार्केटजवळून तीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी व तपासादरम्यान आरोपी पवन हा या सिंडिकेटचा किंग-पीन असल्याचे निष्पन्न झाले. पवनने सांगितले की, तो बहादुरगडमधील हनी ट्रॅपचा मास्टर नीरजला भेटला होता. त्यातून त्यांनी हनी ट्रॅपच्या पद्धती शिकून घेतल्या. पवन फेसबुकवर हनीप्रीत नावाच्या मुलीच्या संपर्कात आला आणि तिने मिळून श्रीमंत लोकांना हनी ट्रॅप करून पैसे कमवण्याची योजना आखली. त्यासाठी त्यांनी पश्चिम विहारमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. हनीप्रीतने रितू बन्सल या नावाने सोशल मीडियावर फेक फेसबुक आयडी तयार करून तक्रारदाराशी व्हिडिओ चॅटद्वारे संभाषण केले आणि नंतर त्याला भेटण्यासाठी फ्लॅटवर बोलावले.

Delhi Police cracks down on Honey Trap Syndicate
भाजपच्या गांधींची मोठी घोषणा, 'अग्निवीरांसाठी पेन्शन सोडायला तयार आहे'

नियोजनानुसार तक्रारदार आल्यानंतर काही वेळातच बनावट पोलीस असल्याचे भासवत तीन आरोपींनी फ्लॅटवर छापा टाकला. आरोपींपैकी मनजीत हा उपनिरीक्षकाचा गणवेश परिधान करायचा, तर इतर दोघे त्याचे अधीनस्थ बनले. या खोट्या छाप्यादरम्यान आरोपी हनीप्रीत पीडितांना पोलीस कर्मचाऱ्याला पैसे देऊन आपली सुटका करण्याची विनंती करत असे. या प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी मनजीतच्या सांगण्यावरून गुन्ह्यात वापरलेला उपनिरीक्षकाचा गणवेशही जप्त केला आहे. आरोपी हनीप्रीतला पकडण्यासाठी पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे, तसेच महिला आरोपी हनीप्रीतचा सतत शोध घेत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com