दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, दिल्ली-यूपीमधून 40 कोटींचा अमली पदार्थ जप्त

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) नार्कोटिक्स ड्रग कार्टेलचा पर्दाफाश केला आहे.
Delhi
DelhiDainik Gomantak

दिल्ली पोलिसांनी नार्कोटिक्स ड्रग कार्टेलचा पर्दाफाश केला आहे. ज्यामध्ये 2 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडून 10 किलो हेरॉईन जप्त केले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 40 कोटी आहे. जप्त केलेले हेरॉईन म्यानमारमधून मणिपूरमार्गे भारतात तस्करी करण्यात आले होते. स्पेशल सेलचे डीसीपी जसमीत सिंग यांच्या म्हणण्यानुसार, 'आमची टीम मणिपूर (Manipur), आसाम (Assam), यूपी, बिहार (Bihar) आणि दिल्लीमध्ये (Delhi) कार्टेल सक्रिय असल्याच्या माहितीवरुन काम करत होती. म्यानमारमधून हेरॉईनची तस्करी करुन मणिपूरला पुरवठा केला जातो. त्यानंतर पुढे देशाच्या विविध भागांमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा केला जातो.' (Delhi Police have arrested drug traffickers)

दरम्यान, या कार्टेलसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागला. या प्रक्रियेदरम्यान, या कार्टेलमधील सामील असलेल्या सदस्यांची ओळख पटवण्यात आली. 24 मार्च रोजी या टोळीतील दोन सदस्य नजीर उर्फ नाझीम आणि दिनेश सिंग यांनी झारखंडमधून हेरॉईनची मोठी खेप घेतल्याची विशेष माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तो त्याच्या मारुती SX4 मधून ISBT सराय काले खानला हा माल त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीला देण्यासाठी येत होता. त्याचवेळी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून कारमधील दोघांना पकडले. दोघांच्या बॅगमधून 06 किलो हेरॉईन म्हणजेच 3-3 किलो जप्त केले. कारची झडती घेतली असता कारच्या मागील सीटखाली 4 किलो हेरॉईन आढळून आले.

Delhi
'द काश्मीर फाइल्स'नंतर विवेक अग्निहोत्री बनवणार दिल्ली दंगलीवर चित्रपट

तसेच, अटक करण्यात आलेल्या दोन पुरवठादारांच्या चौकशीत ते एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या कार्टेलचे सदस्य असल्याचे उघड झाले. या दोघांनी गेल्या 5 वर्षांपासून दिल्ली एनसीआर आणि यूपीच्या काही भागांमध्ये ड्रग्ज पुरवठ्यात सहभाग असल्याचे उघड झाले. त्यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील एका व्यक्तीकडून हे हेरॉईन विकत घेतले होते. त्यानंतर त्याला 6 किलो हेरॉईन दिल्लीतील एका व्यक्तीकडे आणि उर्वरित 4 किलो गाझीपूर यूपीमधील एका व्यक्तीकडे पोहोचवायचे होते. म्यानमार आणि मणिपूरमधील हेरॉइन पुरवठादारांशी संबंध असल्याचा खुलासा या दोघांनीही केला आहे. म्यानमारमधून मणिपूरमध्ये आणले जाणारे बहुतेक हेरॉईन आसाम आणि अरुणाचल प्रदेश या लगतच्या राज्यांमध्ये पाठवण्यात येते. त्यानंतर अमली पदार्थ दिल्लीसह देशाच्या इतर भागांमध्ये पुरवले जातात. या प्रकरणाच्या तपासात झारखंडमधील नक्षलग्रस्त भागात आणि मणिपूरच्या बंडखोरीग्रस्त भागात बेकायदेशीरपणे पिकवल्या जात असलेल्या अफूपासून हेरॉईन बनवले जाते. दोन्ही आरोपींनी सांगितले की, 'आम्ही झारखंडमधील अनेक लोकांकडून हेरॉईन विकत घेतले आहे.'

Delhi
आता ना शत्रूच्या पाणबुड्या लपतील ना युद्धनौका कारण...

याशिवाय, म्यानमार आणि मणिपूरमधून तस्करी केलेल्या हेरॉईनचा दर्जा हा भारतातील कायदेशीररित्या लागवड केलेल्या भागात अफूपासून तयार होणाऱ्या हेरॉइनपेक्षा खूपच चांगला असल्याचेही या दोघांनी उघड केले आहे. यामुळेच म्यानमार आणि मणिपूरमध्ये बनवलेल्या हेरॉईनला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि भारतातही जास्त मागणी आहे. गेल्या 5-6 वर्षांपासून म्यानमारमधून मणिपूरमार्गे देशाच्या इतर भागात हेरॉईन तस्करीचा हा एक प्रमुख मार्ग बनला आहे. म्यानमार आणि मणिपूरमधून आयात केलेले हेरॉईन केवळ तुलनेने स्वस्त आहे असे नाही, तर उत्तर प्रदेशातील बरेली, बदाऊन, बाराबंकी, मध्य प्रदेशातील मंदसौर आणि झालावाड या पारंपारिक प्रदेशांमध्ये कायदेशीररित्या पिकवल्या जाणार्‍या अफूपासून बनवलेल्या हेरॉईनपेक्षा तुलनेने स्वस्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com