लाल किल्ला ते टूलकिट प्रकरणात काय काय घडलं? पोलिसांनी केला खुलासा 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत आहेत. आणि याच आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी प्रजासत्त्ताक दिनादिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर चालू झालेल्या तपासात ही हिंसा देशात आणि विदेशात राहण्याऱ्या 70 जणांच्या कटाचा परिणाम असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करत आहेत. आणि याच आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी प्रजासत्त्ताक दिनादिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर चालू झालेल्या तपासात ही हिंसा देशात आणि विदेशात राहण्याऱ्या 70 जणांच्या कटाचा परिणाम असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. प्रजासत्त्ताक दिनाच्या पंधरा दिवस अगोदर अकरा जानेवारीला या 70 जणांची मिटिंग एका ऍपवर झाल्याचा खुलासा पोलिसांनी आज केला आहे. शिवाय या मीटिंगचे आयोजन खलिस्तान समर्थक संस्था पोएटीक जस्टिस फाउंडेशनने (पीजेएफ) केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

'शिवभोजन' थाळीच्या धर्तीवर ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगाल मध्ये ‘माँ...

यानंतर, अकरा जानेवारीला झालेल्या या ऍपवरील मिटिंगमध्ये बंगळुरू मधील पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू देखील सहभागी झाले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तसेच दिशा रवी व निकिता जेकब यांनी शंतनूसह अन्य काही जणांसोबत मिळून शेतकरी आंदोलनासंबधित 'टूलकिट' तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच दिशा रवीच्या अटकेपूर्वी मुंबईत निकिता जेकबच्या घरी जाऊन दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने 11 फेब्रुवारी रोजी चौकशी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी आज दिली. आणि त्याच्यानंतरच दिशा रवीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र यानंतर  निकिता जेकब फरार झाल्याचे दिल्ली पोलिसांनी आज नमूद केले आहे. 

तसेच, निकिता जेकब आणि शंतनू यांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी आज न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. आणि त्यांच्यासाठी दहा हून अधिक पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. याशिवाय, पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सायबर सेलचे सहआयुक्त प्रेमनाथ यांनी तपासात आणखी एकाचे नाव समोर आल्याचे सांगितले आहे. दिशा रवीने सोशल मीडियावरील ट्विटरवर ट्विट करताना पीटर फ्रेडरिकला टॅग केल्याचे त्यांनी सांगितले. पीटर हा खलिस्तानी दहशतवादी भजनसिंग भिंडर याच्या संपर्कात 2006 पासून असल्याचे सहआयुक्त पोलिसांनी सांगितले. 

याव्यतिरिक्त, टूलकिटच्या प्रकरणात पीटरचे नाव कसे आले याचा तपास करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यानंतर ऍपवर झालेल्या मिटिंगची माहिती पोलिसांनी संबंधित कंपनीकडून मागविली असल्याचे पोलिसांनी आज सांगितले. आणि या मिटिंग मध्ये पीटर फ्रेडरिक होता की नाही याचा तपास चालू असल्याचे पोलिसांनी पुढे नमूद केले.       

शेतकरी आंदोलनासंदर्भात भाजपच्या मंत्र्यांचं धक्कादायक विधान

दरम्यान, खलिस्तानी संघटनांशी संबंधित असलेल्या पीजेएफच्या मो धालीवालने कॅनेडामधेच राहत असलेल्या पुनीतच्या माध्यमातून निकिताशी संपर्क साधला होता. आणि यातून प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर सोशल मीडियावरील ट्विटरवर मोहीम राबवण्याचा त्यांचा हेतू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आणि तसेच 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या ऍपवरील मिटिंग मध्ये मो धालीवाल देखील होता. व त्याने कोणत्याही परिस्थितीत शेतकरी आंदोलनाचा मुद्दा मोठा करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. इतकेच नाही तर, प्रजासत्ताक दिनादिवशी घडलेल्या घटनेनंतर अफवा पसरवण्यासाठी यातील काही जणांनी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी आणि कार्यकर्त्यांकडे संपर्क साधल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.    

संबंधित बातम्या