VIDEO: केसं ओढले, गाडीत ढकललं; युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांच्याशी पोलिसांचे गैरवर्तन

दिल्लीत राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही (Srinivas BV) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Srinivas BV Video
Srinivas BV VideoVideo Screenshot

Congress Protest: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या ईडी चौकशीविरोधात कॉंग्रेस नेत्यांचा निषेध सुरूच आहे. आज देशभरात विविध ठिकाणी काँग्रेस नेते रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान, दिल्लीत राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही (Srinivas BV) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांना ताब्यात घेत असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबतच एक व्हिडिओ काँग्रेसने शेअर केला आहे. (Delhi Police personnel seen pulling hair of President of Indian Youth Congress Srinivas BV)

या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रीनिवास यांना घेरल्याचे दिसत आहे आणि एक कर्मचारी त्यांचे केस ओढतांना, त्यांना ढकलतांना दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. या कर्मचाऱ्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहे.

काय म्हणाले श्रीनिवास?

'स्वतंत्र भारतात, काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या स्वत:च्या पक्षाच्या मुख्यालयाबाहेरही येऊ शकत नाहीत, तर लोकशाहीचा अर्थ काय? हुकूमशहा इतके घाबरतात का? असा प्रश्न श्रीनिवास यांनी ट्विटरवर मोदी सरकारला विचारला आहे.

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केंद्रीय एजन्सी ईडी सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस रस्त्यावरून संसदेपर्यंत निदर्शने करत आहे. दिल्लीत राहुल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस खासदारांनी संसद भवनापासून मोर्चा काढला. मात्र, विजय चौकात पोलिसांनी या नेत्यांना अडवून ताब्यात घेतले. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे निदर्शानास आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com