
Shraddha Walker Killing: दिल्ली पोलीस लवकरच श्रद्धा मर्डर प्रकरणी आरोपपत्र दाखल करु शकतात. दिल्ली पोलिसांनी आरोपपत्राचा मसुदा तयार केला आहे. सध्या कायदेतज्ज्ञ आरोपपत्र तपासत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या अखेरीस कोणत्याही तारखेला आरोपपत्र दाखल केले जाऊ शकते.
दरम्यान, 18 मे 2022 रोजी आफताब पूनावालाने दिल्लीच्या (Delhi) छतरपूर भागात श्रद्धाची गळा आवळून हत्या केली होती आणि त्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3000 हून अधिक पानांच्या आरोपपत्राच्या मसुद्यात 100 साक्षीदारांव्यतिरिक्त फॉरेन्सिक आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा आधार घेण्यात आला आहे. छतरपूरच्या जंगलातून सापडलेली हाडे आणि त्यांचा डीएनए अहवाल ज्याने पुष्टी केली की, ही हाडे श्रद्धाची असून हे सर्व आरोपपत्राचा भाग आहेत.
याशिवाय, आफताब पूनावालाचा कबुलीजबाब आणि नार्को चाचणीच्या अहवालाचाही समावेश आहे. मात्र, या दोन्ही अहवालांना न्यायालयात (Court) फारसे महत्त्व नाही. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी आफताबची पॉलीग्राफी चाचणीही केली होती.
आफताब पूनावाला आणि श्रद्धा वालकर छतरपूरमध्ये एकत्र राहत होते. आफताब हा श्रद्धावर अत्याचार करायचा असेही तपासात समोर आले आहे. ही गोष्ट श्रद्धाने तिच्या मैत्रिणींनाही सांगितली होती. श्रद्धाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधूनही अनेक मोठे खुलासे झाले आहेत.
पोलिसांनी श्रद्धाच्या 23 हाडांचे पोस्टमॉर्टम विश्लेषण देखील केले आहे. आफताबने करवतीने श्रद्धाचे 35 तुकडे केल्याचे अहवालात उघड झाले आहे. पोस्टमॉर्टमच्या विश्लेषणानंतर डॉक्टरांनी सांगितले की, हाडे करवतीने कापण्यात आली.
तसेच, दिल्ली पोलिसांनी कलम 164 अंतर्गत अशा अनेक जबाब नोंदवले आहेत, जे या प्रकरणात अतिशय महत्त्वाचे आहेत. या घटनेतील फॉरेन्सिक पुरावे आफताबला अडचणीत आणू शकतात. हे आरोपपत्राच्या मसुद्याचाही भाग बनवण्यात आले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.