Delhi Tractor Parade Violence "शेतकऱ्यांच्या हिंसेला दिल्ली पोलिसच जबाबदार"

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

कॉंग्रेस नेते  दिग्विजय सिंह आज उज्जैनमध्ये आहेत. ते येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहेत, पण जेव्हा पत्रकारांनी त्यांना राजकीय प्रश्न विचारले तेव्हा ते संतापले.

नवी दिल्ली:  कॉंग्रेस नेते  दिग्विजय सिंह आज उज्जैनमध्ये आहेत. ते येथे एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहेत, पण जेव्हा पत्रकारांनी त्यांना राजकीय प्रश्न विचारले तेव्हा ते संतापले. काल घडलेल्या दिल्लीतील हिंसाचाराबद्दल त्यांना विचारले असता, "काल हिंसाचार सुरू करणाऱ्या 15 आदोलक शतकऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांच्याकडे शासकीय ओळखपत्र असल्याचे आढळले आहे. आता सरकारमधील हे कोण आहे ते लवकरच समजेल. शांततापूर्ण चळवळीला हिंसाचारात बदलण्याचा हा कट रचला गेला होता," असे कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

“गाझीपूर सीमेवर पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी निश्चित केलेल्या नियोजित मार्गावर बॅरिकेडिंग लावले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना थांबविण्यासाठी अश्रुधुरांचा वापर केला. पिरिणामी शेतकऱ्यांकडून हिंसाचार वाढू लागला.” असेही मत कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. दरम्यान दिग्विजय सिंह माध्यमांशी बोलतांना दिल्लीतील हिंसाचार आणि आगामी नागरी निवडणुकांबद्दल बोलले. त्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण नवीन कॉंग्रेस अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भात जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला, तेव्हा ते संतापले  "आपण कॉंग्रेसमध्ये आहे का? हे आमचे प्रकरण आहे आम्ही निर्णय घेऊ" असा उलट प्रश्न त्यांनी पत्रकारांना केला .

पाकिस्तानातून तब्बल 18 वर्षानंतर भारतीय महिलेची सुटका -

 

दरम्यान जासत्ताक दिनाच्यादिवशी शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे नियोजन केले होते. मात्र काही ठिकाणी या रॅलीला हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन आणि दिल्लीतील परिस्थितीसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीस गृहसचिव, दिल्ली पोलिस अधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. व या बैठकीत अर्धसैनिक दलाच्या अतिरिक्त कंपन्या दिल्लीत तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

भारताने 59 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यामुळे चिनी सरकारला राग अनावर -

नवीन कृषी विधेयकातील तीन कायद्यांच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढली होती. परंतु यावेळेस हिंसक घटना घडून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. व त्यानंतर गृहमंत्रालयाने उच्चस्तरीय बैठक घेत दिल्लीत अर्धसैनिक दलाची अजून कुमक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिल्लीत 1500 पेक्षा जास्त अर्धसैनिक दल दाखल होणार आहे. 

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी हल्ला; चार जवान जखमी -

संबंधित बातम्या