Delhi Tractor Parade Violence: दिप सिध्दूच्या मदतीला धावून आली कॅनडाची मैत्रिण

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

दिप सिद्धू 26 जानेवारीपासून फरार होता. सिद्धू फरार असला तरी त्याने सतत फेसबुकवर आपल्या निरागसतेचा झेंडा मिरवला होता. सुत्रांच्या माहितीनुसार एक महिला आणि त्याचे काही मित्र परदेशात बसून त्याचे सोशल मीडिया अकाउंट हाताळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचारातील आरोपी असलेल्या दिप सिद्धूला पोलिसांनी अटक केली आहे. दिप सिद्धू 26 जानेवारीपासून फरार होता. सिद्धू फरार असला तरी त्याने सतत फेसबुकवर आपल्या निरागसतेचा झेंडा मिरवला होता. सुत्रांच्या माहितीनुसार एक महिला आणि त्याचे काही मित्र परदेशात बसून त्याचे सोशल मीडिया अकाउंट हाताळत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता दिपच्या या मैत्रिणीनेही त्याला निर्दोष असल्याचे म्हटले आहे.  पोलिसांना भरकटवण्यासाठी दिप सिद्धू हे करत होता असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

दिप सिद्धू सातत्याने आपले व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत होता आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बोलत होता. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, त्याचे हे व्हिडिओ उत्तर कॅनडामधील एका राज्यातून फेसबुकवर अपलोड केले जात होते. हे सर्व व्हिडिओ दिप सिद्धूची मैत्रिण आणि काही इतर मित्रांनी फेसबुकवर अपलोड केले आहेत. दिप सिद्धू हे व्हिडीओ भारतातून बनवून पाठवत होता असेही सांगण्यात येत आहे.

सिद्धूच्या मैत्रिणीने दिप निर्दोष आहे असे म्हटले आहे. या महिलेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील युवक दिप सिद्धूचे चाहते आहेत. त्यामुळे सिद्धू पुढे यावेत असे शेतकरी नेत्यांना वाटत नव्हते. 26 जानेवारीला दिप सिद्धू लाल किल्ल्यावर होता, त्यांच्या हातात ध्वज होता पण लाल किल्ल्यावर धार्मीक ध्वज फडकविणार असल्याचे सिद्धूने कधीच म्हटले नाही. सिद्धूचा बचाव करत, तिरंगा हा आमचा अभिमान आहे. आम्ही तिरंग्याशिवाय काहीच नाही असे दिपच्या मैत्रिणीने म्हटले आहे.

Delhi Tractor Parade Violence : लाल किल्ला हिंसाचाराचा आरोपी दीप सिद्धूला अटक -

सिद्धूच्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार, या टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर दिप सिद्धू त्यांच्याविरूद्ध कट रचला गेला असल्याचे सिध्द करणार आहे. त्याचबरोबर स्वत:  सिद्धू हा खटलाही लढवतील असा दावा त्यांनी केला आहे. याशिवाय सिद्धूचे वडील वकील सुरजितसिंग सिद्धू यांच्याबद्दल सगळीकडे पसरिलेली माहिती चुकीची असल्याचे सांगण्यात आले आहे.  

दरम्यान सिद्धू 26 जानेवारीनंतर  सतत सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह होता दिल्लीहून पळून गेल्यानंतर दिप सिद्धू हरियाणामध्ये होता, त्यानंतर तो पंजाबमध्ये होता. यानंतर पोलिसांना तो बिहारमध्ये असल्याची माहिती मिळाली, परंतु तो पकडला गेला नाही. पोलिसांनी लवकरच त्याला अटक केली जाईल, असा पोलिसांचा दावा केला होता आणि तो सिध्द करून दाखविला आहे.

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! फक्त चारच दिवस कामाला जावं लागण्याची शक्यता -

दिप सिद्धू पंजाबी चित्रपटांतील प्रसिध्द अभिनेता आहे आणि सामाजिक कार्यकर्ता देखील आहेत. दिपने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात धर्मेंद्र निर्मित ‘रमता जोगी’ या पंजाबी चित्रपटातून केली.  दिपने कायद्याचा अभ्यास केला आहे. 17 जानेवारीला एनआयएने सिद्धूला समन्स बजावला होता.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

संबंधित बातम्या