LOCKDOWN: पाहा वेगवेगळ्या राज्यातील लॉक-अनलॉक परिस्थिती

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 जून 2021

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इ. राज्यांमध्ये, 1 जूनपासून लॉकडाउनसारखे निर्बंध हटवले जात आहेत. 1 जूनपासून कोरोना कर्फ्यू किंवा लॉकडाऊनमध्ये कोणती राज्ये शिथिल आहेत आणि या कालावधीत काय खुले आणि बंद राहील हे जाणून घ्या.

LOCKDOWN: कोरोना विषाणूच्या(COVID-19) घटनांमध्ये घट झाल्याने बऱ्याच राज्यांना आता थोडा दिलासा मिळत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा इत्यादी राज्यात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने खाली आली आहेत. कोरोना रूग्णसंख्या वाढल्यानंतर विविध राज्यात लॉकडाउन लागू झाल्यानंतर अनलॉकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र आजपासून म्हणजेच 1 जूनपासून या राज्यांत निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये लॉकडाउन अजूनही कायम आहे. दिल्लीत, अनलॉक प्रक्रिया 31 मेपासून सुरू झाली, तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इ. राज्यांमध्ये, 1 जूनपासून लॉकडाउनसारखे निर्बंध हटवले जात आहेत. 1 जूनपासून कोरोना कर्फ्यू किंवा लॉकडाऊनमध्ये कोणती राज्ये शिथिल आहेत आणि या कालावधीत काय खुले आणि बंद राहील हे जाणून घ्या. (Delhi UP unlock Maharashtra Goa karnataka odisha lock)

दिल्ली अनलॉक: पहिल्यांदा कामगार, कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे कारखाने मालक त्रस्त आहेत. कोविड लॉकडाउन निर्बंध कमी करण्याच्या कारणास्तव दिल्लीत कारखानदारांनी सहा आठवड्‍यानंतर पुन्हा आपले आस्थापने उघडली. यातील बर्‍याच व्यपाऱ्यांना कामगार आणि कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत आहे आणि उत्पादन घटल्यामुळे तोटा होण्याचा धोका आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढत्या घटना लक्षात घेता दिल्लीत १९ एप्रिलला लॉकडाउन लागू करण्यात आले होते आणि लॉकडाउनच्या सहा आठवड्यांनंतर दिल्ली सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रियेअंतर्गत शहरातील औद्योगिक घटकांना आणि बांधकामांना परवानगी दिली आहे. 

उत्तर प्रदेशात कोरोना कर्फ्यू शिथिल
उत्तर प्रदेश सरकारने कोविड संसर्गामुळे राज्यात सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत लागू करण्यात आलेल्या कोरोना कर्फ्यूमध्ये शिथिलता आणली असून आता शनिवार व रविवारी हा साप्ताहिक कर्फ्यु लागू राहणार आहे. मात्र, रविवारपर्यंत 600 हून अधिक सक्रिय प्रकरण असलेल्या 20 जिल्ह्यांना ही सुट मिळणार नाही.

कर्नाटकात काळ्या बुरशीचा हाहाकार! एका दिवसात 1250 रूग्णांची नोंद

महाराष्ट्र लॉकडाउन

महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 1 जून ते 15 दिवसांपर्यंत वाढविला आहे. मात्र कोरोना रूग्णसंख्येबाबत महाराष्ट्रालाही थोडा दिलासा मिळत आहे. गेल्या काही काळात महाराष्ट्र कोरोना रूग्णसंख्येत देशभरात आघाडीवर होता पण आता लॉकडाउनमुळे या परिस्थीतीवर नियंत्रण मिळवतांना महाराष्ट्र सरकार दिसत आहे.

गोवा कर्फ्यूमध्ये 7 जूनपर्यंत

त्याचबरोबर गोवा सरकारनेही सध्याच्या कोरोना कर्फ्यूमध्ये 7 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. काही जिवनावश्यक वस्तूंना या लॉकडाउन दरम्यान सूट मिळणार असून त्याचीही वेळ निश्चित केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आहे त्या स्थितीतच राज्य संचारबंदी मध्ये सात जून ला सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी पातळीवर तसे आदेश जारी केले जातील. गोव्यामध्ये सध्या संचारबंदी आहे सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली असतात. उद्योग धंदे सुरू आहेत. साप्ताहिक बाजार आणि मासळी ते बाजार बंद आहेत. सिनेमागृहे थिएटर्स तरण तलाव आणि सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम तसेच जाहीर कार्यक्रम बंद आहेत.

Corona Vaccine: मोनोक्लोनोल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल जूनपासून गुजरातमध्ये उपलब्ध 

ओडिशात लॉकडाउन वाढविण्यात आला 
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ओडिशा सरकारने रविवारी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली म्हणजेच 17 जूनपर्यंत ओडीशामध्ये लॉकडाउन पाहणार आहे. टाळेबंदीचा दुसरा टप्पा १ जून रोजी पहाटे पाच वाजता संपणार होता. मुख्य सचिव एस.सी. महापात्र म्हणाले की, लॉकडाऊनचा उद्देश मुख्यत्वे वस्तूंच्या नव्हे तर लोकांच्या हालचालींवर प्रतिबंध घालणे आहे. मागील लॉकडाउनवरील सर्व निर्बंध तिसर्‍या टप्प्यात देखील लागू केल्या जातील. शनिवार व रविवार बंद दुकाने बंद राहतील. 

कर्नाटकमध्ये लॉकडाउन टप्प्याटप्प्याने उघडेल 
कर्नाटकचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी सोमवारी हे स्पष्ट केले की, टप्प्याटप्प्याने राज्यात लॉकडाऊनमध्ये  शिथिल करण्यात येइल. ते म्हणाले की बंगळुरूमध्ये दररोज एक हजाराहून कमी प्रकरणे असतील तर याचा विचार केला जाऊ शकतो. टप्प्याटप्प्याने हे सेक्टर सुरू करण्याबाबत आपले मत मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना कळवले आहे. मात्र, संसर्ग प्रकरणे कमी न झाल्यास लॉकडाउन सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
व्हेंटिलेटर बेडचा वापर 60 टक्क्यांपेक्षा कमी असेल.

संबंधित बातम्या