दिल्लीला पावसाने झोडपले

पीटीआय
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

देशाच्या राजधानीला यंदाच्या पावसाळ्यातील सर्वांत मोठ्या पावसाने झोडपले. त्यामुळे विविध ठिकाणचा परिसर जलमय झाला. वाहतुकही विस्कळीत झाली. 

नवी दिल्ली: देशाच्या राजधानीला यंदाच्या पावसाळ्यातील सर्वांत मोठ्या पावसाने झोडपले. त्यामुळे विविध ठिकाणचा परिसर जलमय झाला. वाहतुकही विस्कळीत झाली. 

गेल्या चोवीस तासात अयानगर केंद्रावर सर्वाधिक ९९ मि.मी. पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसाने रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागली. त्यातच उच्च न्यायालयाजवळ झाड कोसळल्यानेही तेथील वाहतुकीचा खोळंबा झाला. राजा गार्डन आणि मायापुरी उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. 

संततधार पावसाने धानसा रस्त्यावरील खैरा गावाजवळील टी पॉइंटजवळील ड्रेनेजचेही नुकसान झाले. या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने जवळपास २०० मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे, दिल्लीकरांच्या त्रासात आणखी भर पडली. 

सोशल मीडियावर नागरिक कंबरेइतक्या पाण्यातून वाट काढत असल्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले. या पावसाने दिल्लीतील पावसाची तूट भरून निघण्यास मदत झाली. 

संबंधित बातम्या