देवघर टू गोवा व्हाया महाराष्ट्र; रेल्वे मंत्र्यांकडून झारखंडला मोठ 'गिफ्ट'

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

 देवघर ते गोवा ट्रेनची अधिसूचना मंत्रालयाकडून वसंत पंचमी म्हणजेच 15 फेब्रुवारी पर्यंत अधिसुचना जारी केरण्यात येणार आहे.

झारखंड: गुरुवारी (11 फेब्रुवारी 2021) रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी संताल परगनासाठी मोठी भेट दिली आहे. गोड्डा संसद खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली आणि गोवा ते देवघर पर्यंत थेट रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. देवघर ते गोवा ट्रेनची अधिसूचना मंत्रालयाकडून वसंत पंचमी म्हणजेच 15 फेब्रुवारी पर्यंत अधिसुचना जारी केरण्यात येणार आहे.

देवघर ते गोवा ट्रेन सेवा मार्चपासून सुरू केली जोणार आहे.  रेल्वे मंत्रालयाने देवघर ते गोव्यासाठी स्वतंत्र ट्रेन दिली आहे. झारखंड ते गोवा ही पहिली ट्रेन देवघर येथून सुटणार. ही साप्ताहिक ट्रेन असणार आहे. सध्या झारखंड ते गोवा अशी एकही थेट ट्रेन नाही.

पर्यटकांना बाबा नगरीपासून ते प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यापर्यंत या ट्रेनमुळे सुविधा मिळतील. तसेच गोव्यामध्ये काम करणारे संताल परगणामधील कामगार आणि अभ्यास विद्यार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ होणार आहे. ही ट्रेन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून गोव्यातील वास्कोदीगामाकडे जाणार आहे.

धूक्याने केला कहर: यमुना एक्सप्रेसवे वर भीषण अपघात -

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतल्यानंतर, “केंद्र सरकार संताल परगणासारख्या क्षेत्रात देशपातळीवर संपर्क वाढविण्यास गंभीर आहे. माझ्या विनंतीवरून रेल्वेमंत्र्यांनी देवघर ला मोठी भेट दिली आहे. देवघर ते गोवा या रेल्वे सेवेमधून पर्यटक, विद्यार्थी व कामगार यांना सुविधा मिळतील. या ट्रेनची अधिसूचना 15 फेब्रुवारीपर्यंत देण्यात येणार असून देवघर ते गोवा ट्रेन मार्चपासून सुरू होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानतो.” असे गोड्डाचे खासदार डॉ. निशिकांत दुबे म्हणाले.

संबंधित बातम्या