डेरा प्रमुख राम रहीमला कोरोनाची लागण

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 जून 2021

विशेष सीबीआय न्यायालयाने त्याला 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid19) वाढत असताना बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम (Ram Rahim) याला कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. तीन दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणामुळे राम रहीमला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या पोटात दुखत दुखत असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. याचवेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दोन महिला अनुयायांसोबत केलेल्या बलात्कारप्रकरणी 2017 पासून डेरा प्रमुख राम रहीम तुरुंगात शिक्षा भोगत आहे. विशेष सीबीआय (CBI) न्यायालयाने त्याला 20 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. (Dera chief Ram Rahim contracted corona) 

मधुमेह आणि रक्तदाबाचा गुरमीत राम रहीमला त्रास आहे. त्यावर औषधोपचार सुरु आहे. दरम्यान 3 जून रोजी त्याच्या पोटात दुखत असल्याची तक्रार त्याने केली होती. त्यानंतर त्याला तुरुंग प्रशासनाने त्वरीत पीजीआय रोहतक रुग्णालयामध्ये (PGI Rohtak Hospital) दाखल करण्यात आले. दोन तपासण्या झाल्यानंतर त्याची पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर रहीमला इतर चाचण्या करण्यासाठी एम्समध्ये (AIIMS) दाखल करण्यास सांगितले होते. मात्र एम्समधील कोविड सेंटर बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याला मेदांता रुग्णालयामध्ये (Medanta Hospital) भरती करण्यात आले. तिथे चाचणी केल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अनेक राज्यात अनलॉक; या चुका पुन्हा झाल्यास तिसऱ्या लाटेला आमंत्रण

''मागील दिवसांपासून गुरमीत राम रहीम याला पोटदुखीचा त्रास होत आहे. यासाठी त्याला रोहतक येथील पीजीआय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र तिथे त्याच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्यानंतर चाचणीसाठी मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे चाचणी दरम्यान राम रहीमला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले,'' असे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 
 

संबंधित बातम्या