भारतातील अनोखे मंदिर; येथे भक्तांना प्रसादात मिळतात सोन्या-चांदीचे शिक्के

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

दरवर्षी दिपावली उत्सवाच्या दरम्यान मंदिराला  भक्तांनी दिलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांनीही सजवण्यात येते. दिपोत्सवादरम्यान मंदिरात कुबेर दरबार भरवला जातो. यावेळी येणाऱ्या भक्तांना प्रसादरूपात सोन्याचे शिक्के किंवा पैसेही दिले जातात.

रतलाम- भारतातील मंदिरांबाबतच्या कितीतरी गोष्टी, तेथील नवनवीन प्रथा आपण ऐकलेल्याच असतील. मात्र, मध्यप्रदेशातील या मंदिराबद्दल आपण आज प्रथमच एक नवीन प्रथमच प्रथा ऐकत असाल. भारतात इतरत्र कोणत्याही मंदिरात तुम्ही दर्शन घेऊन झाल्यावर हात पुढे केला तर तुमच्या हातावर प्रसाद टेकवण्यात येईल. मात्र, मध्यप्रदेशातील रतलाम जवळील माणक येथील महालक्ष्मीचं मंदीर याला अपवाद आहे. येथे तुम्ही आशीर्वाद रूपी प्रसादासाठी हात पुढे केला की तुमच्या हातावर चक्क सोन्या-चांदीचे शिक्के ठेवण्यात येतात.  

 महालक्ष्मीच्या या मंदिरात येऊन भक्तमंडळी कोट्वधी रूपयांच्या भेट अर्पण करतात. दरवर्षी दिपावली उत्सवाच्या दरम्यान मंदिराला  भक्तांनी दिलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांनीही सजवण्यात येते. दिपोत्सवादरम्यान मंदिरात कुबेर दरबार भरवला जातो. यावेळी येणाऱ्या भक्तांना प्रसादरूपात सोन्याचे शिक्के किंवा पैसेही दिले जातात.

या मंदिराबद्दल आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे दिवाळीच्या दिवशी या मंदिराचे सर्व दरवाजे खुले करून ठेवण्यात येतात. मंदिराच्या सर्व तिजोऱ्याही यावेळी खुल्या ठेवलेल्या असतात. येथे येणाऱ्या भक्तांना खाली हात न जाऊ देता त्यांना प्रसादरूपी भेट देण्यात येते.

या मंदिरात दागिने आणि रूपये अर्पण करण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. या आधी येथे राज्य करणारा राजा राज्याची संपत्ती वाढवण्यासाठी दिपावलीच्या वेळी देवीला येथे दागिने अर्पण करत असे. त्यामुळे अनेक भक्तांनीही आपापल्या परीने देवीला दागिने किंवा पैसे अर्पण करायला सुरूवात केली. देवीला असे काहीतरी अर्पण करून आपल्यावर लक्ष्मीची कायम छाया पडत राहील असा समज महालक्ष्मीचा भक्तांचा आहे. 

संबंधित बातम्या