सुरतमध्ये लाखो रुपयांचे हिरेजडित मास्क

Avit Bagle
रविवार, 12 जुलै 2020

लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद असल्याने सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले.

सुरत

कोरोनाव्हायरसमुळे मास्क घालणे अनिवार्य असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध होत आहे. यात सोन्याचा मास्क घालणारे आहेत. सुरतमधील एका हिरे व्यावसायिकाने हिरेजडित मास्क तयार केले आहेत.
लॉकडाउनमुळे व्यवसाय बंद असल्याने सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. यातून बाहेर पडण्यासाठी सुरतमधील व्यावसायिकाने शक्कल लढवीत हिरेजडित मास्क तयार केले आहेत. ‘एन-९५’ प्रकारच्या आणि तीन स्तरांचे संरक्षण असलेल्या हिरेजडीत मास्क लोकप्रिय होत आहेत. व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार मास्कवर खरे व सिथेंटिक असे दोन्ही प्रकारचे हिरे जडावले आहेत. वेगवेगळ्या डिझाइनच्या या मास्कचे आकर्षण वाढत आहे.

असा आहे मास्क
- मास्कवर आधी सोन्याची जाळी लावलेली आहे.
- जाळीवर हिरे जडावले आहेत.
- सिथेंटिक हिऱ्यांच्या मास्कची किंमत एक ते दीड लाख रुपये
- खऱ्या हिऱ्याच्या मास्कची किंमत तब्बल साडेचार लाख रुपयांपर्यंत आहे.
- ग्राहकांच्या कुवतीनुसार १५० ते ४०० हिरे मास्कवर लावले जातात.

एका ग्राहकाने विवाह समारंभासाठी अनोखी व वैशिष्टपूर्ण काही देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आम्ही वधु-वरासाठी हिरे जडावलेले मास्क तयार केले.
दीपक, हिरे व्यावसायिक, सुरत

संबंधित बातम्या