ज्योतिरादित्य दिग्विजय सिंहांना म्हणाले.. तुमच्या आशिर्वादांमुळेच आलो भाजपमध्ये

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कृषी कायद्यांमधील सुधारणांच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप केला. 

नवी दिल्ली :  कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया आणि कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यादरम्यान राज्यसभा अध्यक्षांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान जुगलबंदी बघावयास मिळाली. भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कृषी कायद्यांमधील सुधारणांच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप केला. 

शेतकरी आंदोलनासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

ज्योतिरादित्य सिंधियांनंतर बोलण्यासाठी उठलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ खासदार दिग्विजय सिंह म्हणाले, “सिंधियाजींचे अभिनंदन. वाह सिंधीया महाराज, यूपीएच्या कार्यकाळात तुम्ही याच पद्धतीने सभागृहात यूपीएची बाजू घेत होता, आज तुम्ही याच सभागृहात भाजपची बाजू मांडली.” त्यावर ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हे सर्व तुमचे आशीर्वाद आहेत.” यावर उत्तर देताना दिग्विजय सिंह म्हणाले, “आमचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आधीही होता आणि यापुढेही राहील.”

राहुल गांधींचा हल्लाबोल; अर्थसंकल्प, शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवर डागली तोफ

भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, कृषी सुधारणांचा अजेंडा आधी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात मांडला गेला होता. त्यावेळी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी 2010-2011 मध्ये प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि सांगितले की कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग आवश्यक आहे आणि त्यासाठी एपीएमसी कायद्यात सुधारणा केली जावी. आपले मत सोयीनुसार बदलण्याची सवय आपल्याला बदलावी लागेल. पट भी मेरा और चट भी मेरी.. हे किती काळ चालणार?

Farmer Protest: राकेश टिकैत महापंचायत मध्ये बोलताना कोसळला स्टेज

तत्पूर्वी, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी आज राज्यसभेत नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टिका केलीआणि शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे पाहता दिल्ली सीमेवर झालेल्या प्रचंड गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी सभागृहाला विचारले, शेतकऱ्यासाठी अशा काटेरी तारा लावल्याचे जेपींनी पाहिलं असतं, तर काय विचार केला असता ? 

 

 

संबंधित बातम्या