Holi 2023: स्विगीच्या जाहीरातीमुळे वाद विकोपाला,हिंदूच्या सणाला...

Holi 2023: ज्यावर अंडी दिसून येत आहेत.
Swiggy
Swiggy Dainik Gomantak

Holi 2023: स्वीगीने होळीच्या सणानिमित्त केलेल्या एका जाहीरातीवरुन मोठा वाद निर्माण होताना दिसत आहे. स्विगीने होळीनिमित्त जाहीरातीचे मोठे पोस्टर लावले आहेत. ज्यावर अंडी दिसून येत आहेत.

यावरुन स्विगी हे किती हिंदूविरोधी आहे हे दिसून येते असे म्हटले आहे. इतर कोणत्या सणाला तुम्हाला अशी जाहीरात दिसणार नाही मात्र हिंदूच्या सणाला अंड्याची जाहीरात करुन स्विगीचा हिंदूधर्माला विरोध आहे असे म्हटले आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर व्यक्त केल्या आहेत.

आता ट्विटरवर #HinduPhobicSwiggy असा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. याबरोबरच, यूट्यूबर एल्विश यादव, भगवा क्रांति सेनाच्या राष्‍ट्रीय अध्‍यक्ष डॉ. प्राची साध्‍वीने #HinduPhobicSwiggy या हॅशटॅगला ट्रेंड करण्याचे आवाहन केले आहे.

एल्विश यादवने लिहले आहे की - स्विगीने केलेली जाहीरात होळीला बदनाम करण्यासाठी केलेली जाहीरात आहे. ही जाहीरात लोकांच्या मनावर चूकीचा परिणाम करेल. जेव्हा बिगर हिंदू( Hindu )चे सण असतात तेव्हा तुम्हाला अशा जाहीराती दिसून येत नाहीत.

हा स्पष्टपणे भेदभाव आहे. याबरोबरच त्याने पुढे म्हटले आहे की, स्विगीने संवेदनशीलता दाखवत हिंदू समुदायाची माफी मागितली पाहिजे.

Swiggy
Neiphiu Rio Swearing In Ceremony: नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून नेफ्यू रियो यांनी घेतली पाचव्यांदा शपथ

दुसरीकडे प्राची साध्वीने स्विगीच्या जाहीरातीबाबत अनेक ट्वीट केले आहेत. या जाहीरातीविरुद्ध एक लाख ट्वीट करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .

सनातन्यांची पॉवर दाखवून द्या असेही त्यांनी म्हटले आहे. आणखी एका ट्वीटमध्ये स्विगी अॅप अनइनस्टॉल करण्याचे आवाहन केले आहे. काही लोकांनी स्वीगी बॉयकॉट करा असे म्हटले आहे. तर काहीजणांनी म्हटले आहे की, स्विगीच्या जाहीरातविभागात अतरंगी लोकं काम करतात त्यांच्या जाहीरातीमुळे वादविवादाला सुरुवात होते असे म्हटले आहे.

दरम्यान, जाहीरातीमध्ये अंड्याबरोबर वापरलेल्या #BuraMatKhelo या हॅशटॅगमुळे वाद निर्माण होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com