ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना दिलीप घोष यांची जीभ घसरली  

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 मार्च 2021

देशाच्या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवणुकांचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. आणि त्यासोबतच राजकीय पक्षांचे एकमेकांवरचे हल्ले देखील तीव्र होत असल्याचे पहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये होत असलेल्या निवडणूक चांगल्याचा प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

देशाच्या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवणुकांचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. आणि त्यासोबतच राजकीय पक्षांचे एकमेकांवरचे हल्ले देखील तीव्र होत असल्याचे पहायला मिळत आहेत. त्यातल्या त्यात पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये होत असलेल्या निवडणूक चांगल्याचा प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची धूळ वाढलेली असतानाच आता, पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख दिलीप घोष यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. (Dilip Ghosh made a controversial statement while criticizing Mamata Banerjee)    

दिलीप घोष यांनी एका सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना, ममता बॅनर्जी यांना जर आपले पायच दाखवायचे असतील तर त्यांनी साडी ऐवजी बर्मुडा घालू शकतात, असे म्हटले आहे. दिलीप घोष यांच्या या वक्त्यावरून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्ष आणि दिलीप घोष यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. दिलीप घोष यांचा सभेतील एक व्हिडिओ देखील समोर आला असून यामध्ये ते ममता बॅनर्जी यांच्या पायाच्या दुखापती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. याशिवाय दिलीप घोष हे ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना, लोक त्यांचा चेहरा बघू इच्छित नसल्यामुळेच त्या आपला दुखापग्रस्त पाय दाखवत असल्याचे म्हटले आहे. 

पाया पडण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याचे नरेंद्र मोदींनीच शिवले पाय

त्यानंतर, या व्हिडिओ मध्ये पुढे दिलीप घोष हे ममता बॅनर्जी यांनी साडी घातलेली असल्यामुळेच त्यांचा एक पाय हा झाकलेला आहे, तर दुसरा पाय दिसत असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर यापूर्वी अशी साडी घातलेली कोणालाही पाहिली नसल्याचे म्हणत, जर त्यांना पायच दाखवायचे असल्यास त्या बर्मुडा घालू शकतात, असे दिलीप घोष यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त, ममता बॅनर्जी यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून मात्र त्यांनी उजव्या पायाला प्लास्टर केले असल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर उपचार करणारे असे डॉक्टर येतातच कुठून हे आपल्याला कळत नसल्याचे दिलीप घोष यांनी म्हटले आहे. 

तसेच, दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीवरून बोलताना यासंदर्भात कोणताही अहवाल पाहायला मिळाला नसल्याची टीका केली असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. शिवाय, फ्रॅक्चर झालेलेच असेल तर प्लास्टर दोन दिवसात काढता येत नसल्याचे सांगत, त्यास किमान 21 दिवस लागतात, असे दिलीप घोष म्हणताना दिसत आहेत. 

दरम्यान, दिलीप घोष यांनी बंगालच्या पुरलीया येथे आयोजित सभेत भाषण करताना दिलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी चांगलीच टीका केली आहे. टीएमसीचे खासदार महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडियाच्या ट्विटरवर लिहिताना, आणि या माकडांना वाटते की ते बंगालमध्ये जिंकतील, असे लिहिले आहे.          

संबंधित बातम्या