आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत कायम 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 28 फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) आज याबाबतची माहिती दिली असून, कोरोना विषाणूची नवी स्ट्रेन आणि युरोपियन देशांमध्ये वाढत असलेल्या प्रकारणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे डीजीसीए म्हटले आहे. मात्र वंदे भारत मिशन अंतर्गत होत असलेली आंतराष्ट्रीय उड्डाणे मर्यादित स्वरूपात चालूच राहणार असल्याची माहिती डीजीसीए दिली. 

CBSE 'दहावी - बारावी'च्या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

देशांतर्गत उड्डाणांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच भारताने अन्य देशांमध्ये होणाऱ्या नियमित उड्डणांवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनजन्य परिस्थितीत थांबविण्यात आलेली देशातील विमान वाहतूक आता पूर्वीप्रमाणे 70 वरून 80 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे देशातील विमानसेवा आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवेनंतर देशांतर्गत वाहतूक देखील पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा मागील वर्षाच्या 25 मे रोजी कोरोनाची खबरदारी घेत काही अटींसह देशातील विमान प्रवासाला परवानगी देण्यात आली होती. आणि त्यावेळेस 30,000 प्रवाश्यांसह घरघुती विमानसेवा चालू झाली होती. तर 30 नोव्हेंबर पर्यंत ही संख्या वाढत जाऊन, प्रवाशांचा आकडा 2.52 लाखांवर पोहचला होता.    

संबंधित बातम्या