Himachal Pradesh Election Result: हिमाचल प्रदेशात CM पदासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्यांच्या नावावर चर्चा

काँग्रेस 39 जागांवर आघाडीवर तर भाजपची 28 जागांवर आघाडी
Himachal Pradesh Election Result
Himachal Pradesh Election ResultDainik Gomantak

Himachal Pradesh Election Result: एकीकडे गुजरामध्ये भाजपचे कमळ पुन्हा उगवणार असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे उत्तर भारतातील हिमाचल प्रदेशात भाजपचे कमळ कोमेजले आहे. येथे काँग्रेस सत्तेत येणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या काँग्रेस येथे 40 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे. आत्तापर्यंत भाजपने 8 जागा जिंकल्या असून काँग्रेसने 7 जागा जिंकल्या आहेत.

Himachal Pradesh Election Result
Himachal Pradesh Election Result: हिमाचलमध्ये काँग्रेसची मोठी रणनीती, विजयी आमदार होणार राजस्थानला रवाना

सूत्रांच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशात आता काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मंथन सुरु झाले आहे. यात हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिभा सिंह, माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाचा विचार केला जात असल्याची माहिती आहे. प्रतिभा सिंह या मंडी येथील माजी खासदार होत्या. त्या हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. वीरभद्र सिंह हे हिमाचल प्रदेशचे सहा वेळा मुख्यमंत्री होते.

दरम्यान, या नेत्यांशिवाय हलोलीतील काँग्रेस नेते मुकेश अग्निहोत्री, द्रंग येथील कौलसिंह ठाकूर, श्रीनैना देवीजी येथील रामलाल ठाकूर, सोलन येथील कर्नर धनीराम शांडिल्य, डलहौसी येथील आशाकुमारी हे देखील काँग्रेसमधून मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत.

Himachal Pradesh Election Result
Himachal Pradesh Election Results 2022: हिमाचलमध्ये भाजपला मोठा झटका, काँग्रेस आघाडीवर, कोण उधळणार गुलाल?

हिमाचल प्रदेशमध्ये 3 मंत्री पराभूत

हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या मंत्रीमंडळातील तीन विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. डॉ. रामलाल मारकंडा हे लाहौल स्पिती येथून पराभूत झाले आहेत. त्यांना काँग्रेसच्या रवी ठाकूर यांनी पराभूत केले. कांगडा जिल्ह्यातील शाहपूर येथून मंत्री सरवीन चौधरी या देखील पराभूत झाल्या. त्यांना काँग्रेसच्या केवल सिंह पठानिया यांनी पराभूत केले. तर नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांना शिमला जिल्ह्यातील कसुमपटी या मतदारसंघात काँग्रेसच्या अनिरूद्ध सिंह यांनी पराभूत केले.

जयराम ठाकूर विक्रमी सातव्यांदा विजयी

हिमाचल प्रदेशातील सराज या मतदारसंघातून CM जयराम ठाकुर यांनी काँग्रेसच्या चेतराम ठाकुर यांना विक्रमी 20 हजारहून अधिक मतांनी पराभूत केले आहे. जयराम ठाकूर सातव्यांदा विजयी झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com