टूलकिट प्रकरणी दिशा रवीला अखेर जामीन मंजूर

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

टूलकिट प्रकरणात अटकेत असलेल्या पर्यावरणवादी दिशा रवीला अखेर पटियाळा हाऊस न्य़ायालयाने जामीन मंजूर केला आहे.

नवी दिल्ली: टूलकिट प्रकरणात अटकेत असलेल्या पर्यावरणवादी दिशा रवीला अखेर पटियाळा हाऊस न्य़ायालयाने जामीन मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिशा रवीची चार दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळत दिशाचा 1 लाख रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. सोमवारी न्यायालयाने दिशाची एका दिवसाची पोलिस कोठडी दिल्ली पोलिसांना दिली होती.

पोलिसांनी न्य़ायालयात पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मात्र पोलिसांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, टूलकिट प्रकरणात दिशाबरोबर शंतनु मुळुक आणि निकीता जेकब यांचाही समावेश आहे. शंतनु मुळुक आणि निकीता जेकब यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांकडून तिच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळत तिने शंतनु आणि निकीता जेकब या दोघांना यासंबंधी जबाबदार धरले आहे. आता दिल्ली पोलिसांसमोर या तिघांची एकमेकांसमोर बसवून चौकशी करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

सोशल मिडिया वापरण्याचे 'हे' नवे नियम माहिती आहेत का? 15 एप्रिलपासून...

टूलकिट प्रकरणात पर्यावरणवादी 21 वर्षीय दिशा रवीला दिल्ली पोलिसांनी बंगळूरमधून 14 फेब्रुवारीला अटक केली होती. दिशा एक पर्यावरणवादी सामाजीक कार्यकर्ती असून फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनची ती संस्थापक सदस्य आहे. दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात 4 फेब्रुवारीच्या दिवशी दिशावर आरोपपत्र दाखल केलं होतं. दिशाने कृषी कायद्यांच्या संदर्भातील टूलकिटमध्ये एडिटिंग करुन ते पुढे फॉरवर्ड केले होते. दिशा बंगळूरमधील प्रतिष्ठीत वूमेन्स कॉलेजच्या माउंट कार्मेलची विद्यार्थिनी आहे.

संबंधित बातम्या