Kumbh Mela 2021: कुंभ मेळ्याच्या समाप्तीवरून आखाड्यांमध्ये वाद

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

श्री पंचायती आखाडा, श्री निरंजन आखाडा आणि आनंद आखाडा यांच्यात कुंभमेळा संपल्याची घोषणा करण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

उत्तराखंडच्या हरिद्वार मध्ये सध्या कुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या वेगेवगेळ्या आखाड्यांच्या महंतांमध्ये  कुंभ मेळा संपण्याच्या मुद्द्यावरून वाद सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. श्री पंचायती आखाडा, श्री निरंजन आखाडा आणि आनंद आखाडा यांच्यात कुंभमेळा संपल्याची घोषणा करण्यावरून वाद निर्माण झाला आहे. बैरागी आखाड्यांचे शाही स्नान बाकी असताना कुंभ संपल्याची घोषणा करण्यात आली त्यावरून हा वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येते आहे. (Disputes in the Akhadas since the end of Kumbh Mela)

आनंद आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी बालकानंद गिरी यांनी समस्त हिंदू धर्मियांची माफी मागावी अशी मागणी  बैरागी आणि निर्वाणी आखाड्याचे अध्यक्ष महंत धर्मदास यांनी केली आहे. शुक्रवारी बैरागी कॅम्प मधील पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना 'निरंजनी आणि आनंद एखाद्याने केलेल्या घोषणेमुळे कुंभमेळा संपला असा चुकीचा संदेश जगभरात  गेला आहे. मात्र तसे नसून, बैरागी आखाड्याचे शाही स्नान अजून बाकी आहे." असे स्पष्ट केले. तसेच पुढे त्यांनी असेही सांगितले की या घटनेमुळे निर्वाणी आणि आखाड्यांमध्ये मोठ्या नाराजी आहे. यावेळी त्यांच्यासोबत दिगंबर आखाड्याचे प्रमुख श्री महंत कृष्ण दास आणि निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत राजेंद्र दास हे सुद्धा उपस्थित असल्याचे समजते आहे. 

दरम्यान, कुंभमेळा संपल्याची घोषणा करण्यावरून या आखाड्यांमध्ये वाद सुरु असल्याचे दिसून येते आहे. कुंभ मेळा अधिकारी दीपक रावत आणि आयजी संजय गुंज्याल यांनी असे स्पष्ट केले की सरकार आणि कुंभमेळा व्यवस्थापन यांच्याकडून कुंभमेळा संपल्याची कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 
 

संबंधित बातम्या