टपाल विभागातर्फे आयसीएमआर कीटचे वितरण

मिझोरमच्या झोरम वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी किटचे वितरण
मिझोरमच्या झोरम वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी किटचे वितरण

नवी दिल्ली, 

भारतीय टपाल विभागाने आयसीएमआर सोबत त्याच्या 16 प्रादेशिक डेपोंमधून देशभरातील कोविड-19 चाचणी साठी नियुक्त केलेल्या 200 अतिरिक्त प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 चाचणी कीट वितरीत करण्यासाठी करार केला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दररोज सुमारे 1 लाख चाचणी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या महत्वपूर्ण कामासाठी, 1,56,000 टपाल कार्यालयांचे विशाल जाळे असणारा टपाल विभाग पुन्हा एकदा कोविड योद्धा मह्नुन्काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय टपाल विभागाने डूंगरपूर, चूरू, झालावाड़, कोलकाता, भुवनेश्वर, रांची, जोधपूर, उदयपूर, कोटा व इतर काही ठिकाणांसह इंफाळ, आयझॉल अशा दुर्गम भागात देखील माल पाठविला आहे.  

केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान आणि कायदा व सुव्यवस्था मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आयसीएमआर आणि टपाल विभागामधील नवीन वचनबद्धता आणि भागीदारीचे कौतुक केले. ते म्हणाले की, भारतीय टपाल विभाग या लॉकडाऊन कालवधीत लोकांना पत्र, औषधे, आर्थिक सहाय्य अगदी घरपोच देत आहे तसेच गरजू लोकांना अन्न आणि शिधा देखील वितरीत करत आहे. भारतीय टपाल विभागाचे पोस्टमन या आव्हानाच्या काळात संपूर्ण देशासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत या सर्वांचे त्यांनी कौतुक केले.

किट्स चे वेळेवर वितरण सुनिश्चित व्हावे यासाठी सरकार सर्व उपाययोजना करत आहे. टपाल विभागाने आयसीएमआर सोबत त्याच्या 16 प्रादेशिक डेपोंमधून (14 टपाल मंडळे/ राज्यांमधील)  शिवमोगा, तिरुनेलवेली, धर्मपुरी, तिरुपती, दार्जिलिंग, गंगटोक, लेह, जम्मू, उधमपूर, झालावाड़, भावनगर शोलापूर, दरभंगा, ऋषिकेश, फरीदकोट अशा दुर्गम भागांसह देशभरातील 200 प्रयोगशाळांमध्ये किट्स चे वितरण करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.

वेळेवर वितरण सुनिश्चित व्हावे यासाठी टपाल विभागाचे कर्मचारी 24 तास कार्यरत आहेत. देशासाठी कर्तव्याची हाक ऐकत, रात्री 11.30 नंतर देखील वितरण केले जात आहेत. झोराम वैद्यकीय महाविद्यालय, मिझोरम यासारख्या दुर्गम भागातही किटची आवश्यकतेनुसार वितरणाची खात्री करण्यासाठी भारतीय टपाल विभाग वचनबद्ध आहे.

सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही एजन्सीकडून (डीओपी आणि आयसीएमआर) प्रत्येक प्रादेशिक डेपोसाठी नोडल अधिकारी नियुक्त केला आहे. विद्यमान यंत्रणेनुसार किंवा नवीन व्यवस्थेच्या आवश्यकतेनुसार संबंधित प्रयोगशाळांना पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंच्या प्राधान्याने वाहतुकीसाठी या मंडळांनी वेळोवेळी आवश्यक व्यवस्था केली आहे आणि आयसीएमआर नोडल अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे.

प्रत्येक बुकिंग मंडळाने एजन्सीसाठी अडथला मुक्त व्यवस्था स्थापित करण्यासाठी संबंधित डेपोकडे स्पीड पोस्टचे बीएनपीएल (बुक नाऊ पे लेटर) खाते उघडले आहे. वितरणाची माहिती दररोज व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून प्रयोगशाळेसोबत सामायिक केली जाते. कोणत्याही ऑपरेशनल ग्लॅचला ध्वजांकित करण्यासाठी बुकिंग आणि टेस्टिंग किट्सचा वितरण तपशील अद्ययावत करण्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांसमवेत गुगलचे स्प्रेडशीट सामायिक केले आहे.

केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान आणि कायदा व सुव्यवस्था मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी विभागाला आपली चांगली कामे सुरू ठेवण्याची विनंती केली आणि औषधे, चाचणी किट आणि इतर वैद्यकीय उपकरणांचे वेळेवर वितरण करण्यात कोणतीही कसर सोडू नये असे आवाहन केले. त्यांनी विभागाला त्याच्या जाळ्याचा विस्तार करण्याची प्रेरणा दिली आणि आवश्यक वस्तूंच्या वितरणात कोणतीही कमतरता ठेऊ नये असे सांगितले.

भारतीय टपाल विभागाने मणिपूर मधील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोविड-19 चाचणी कीट वितरीत केले.

आयसीएमआरचे 16 डेपो एनआयएमआर, नवी दिल्ली, पीजीआय चंडीगड, केजीएमयू लखनऊ, आरएमआरआय पटना, एनआयआरएनसीडी जोधपूर, एनआयओएच अहमदाबाद, एनआयआरईएच भोपाळ, एनआयसीईडी कोलकाता, एनआयव्ही पुणे, एनआयव्ही फील्ड युनिट बंगळूरू, एनआयएन हैदराबाद, एनआयई चेन्नई, आरएमआरसी डिब्रूगड, आरएमआरसी भुवनेश्वर, एनआयआरआरएच मुंबई, जीएमसी गुवाहाटी हे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com