तीन महिने अगोदरच दिवाळी साजरी

ayodhya
ayodhya

नवी दिल्ली

अयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजनाकडे जगाचे लक्ष लागले होते. त्यामुळे जगभरातील प्रसार माध्यमांनी भूमिपूजन कार्यक्रमाची विशेषत्वाने दखल घेतली आहे. सीएनएन, द गार्डियन, अल-जजिरा आणि पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने देखील भूमिपूजनाविषयीची भूमिका मांडली आहे. गार्डियनने अयोध्येत तीन महिने अगोदरच दिवाळी साजरी झाली असल्याचे म्हटले आहे, तर कोरोना संसर्ग असतानाही पंतप्रधानांनी मंदिर कामाचे भूमिपूजन केल्याचे सीएनएनने म्हटले आहे.
सीएनएनने म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी हिंदुंचे सर्वात पवित्र स्थान समजल्या जाणाऱ्या राम मंदिराचे भूमिपूजन केले आहे. भारतात सलग पाचव्या दिवशीही ५० हजाराहून कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत असताना भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे. सध्याच्या काळात भारत कोरोना क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. गृहमंत्री अमित शहा आणि अयोध्या मंदिरातील पुजारीसह चार सुरक्षा कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाले आहेत.
न्यायालयाकडून मंदिराचा मार्ग मोकळा: बीबीसी
बीबीसीने भूमिपूजनाबरोबरच राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या वादाचा उल्लेख केला आहे. गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. मुस्लिम धर्मियांसाठी मशिदीसाठी वेगळी जागा देण्यात आली आहे, असे बीबीसीने नमूद केले आहे.
तीन महिने अगोदरच दिवाळी: गार्डियन
ब्रिटनचे वृत्तपत्र द गार्डियनने म्हटले की, अयोध्येत तीन महिने अगोदरच दिवाळी साजरी झाली आहे. अयोध्येतील राम मंदिर हे अनेक दशकांपासून भारतीय इतिहासातील सर्वात भावनिक मुद्दा राहिला आहे. भगवान राम हे हिंदुंत सर्वात पूजनिय आहे. त्यांचे मंदिर होणे हे हिंदुंसाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. परंतु भारतीय मुस्लिमांत दोन प्रकारच्या भावना आहेत. एकीकडे मशिद पतनाबद्धल वाईट वाटत आहे तर दुसरीकडे मंदिर उभारणीस मूक संमती देत आहेत, असे गार्डियनने म्हटले आहे.
नव्या प्रकारच्या भारतीय घटनेचे भूमिपूजन: डॉन
वृत्तसमूह डॉनने म्हटले की, मोदींचे टीकाकार हे धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्र करण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे, असे म्हणत आहेत. भारतातील सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) चे माजी अध्यक्ष प्रताप भानू मेहता यांचा संदर्भ देत ‘डॉन’ ने म्हटले की, राम मंदिराचे भूमिपूजन हे एक वेगळ्या प्रकारच्या भारतीय घटनेचे भूमिपूजन आहे. भारताच्या मूलभूत घटनात्मक रचनेत बदल होत आहे, असे दिसते.
अलजझिरा: आखातातील प्रमुख माध्यम संस्था अल जजिराने म्हटले की, भारताच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीशी तडजोड केली जात आहे.
एबीसी न्यूज: कोरोना संसर्गामुळे गर्दी उसळली नाही, पण भारतातील हिंदू आनंदी आहेत. येथे उभारण्यात येणारे मंदिर जगातील भव्यदिव्य मंदिरापैकी एक असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com