सामान्यांची दिवाळी गोड

सामान्यांची दिवाळी गोड
Diwali sweet for the common man

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करत आज लॉकडाउनमुळे कंबरडे मोडलेल्या कर्जदारांना मोठा दिलासा देऊ केला आहे. मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार)काळातील व्याजाच्या रकमेवरील चक्रवाढ व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  


लॉकडाउनच्या काळात कर्जाचे हप्ते पुढे ढकलणाऱ्या कर्जदारांना यामुळे दिलासा मिळेल. आता सर्वसाधारण व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक केंद्र सरकारतर्फे भरला जाईल. २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजात ही सूट मिळणार आहे. अर्थमंत्रालयाने आज याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. मोरॅटोरियमच्या काळातील व्याज आकारणीचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट असून २ नोव्हेंबरला याची सुनावणी होणार आहे. त्याआधीच केंद्र सरकारने आज या निर्णयाच्या माध्यमातून न्यायालयाला आपली भूमिका कळविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यामुद्द्यावर सरकारला ठोस कार्यवाही करण्याची सूचना केली होती. 

सरकारचा लाभांश
    सर्वसाधारण व्याज, चक्रवाढ व्याज यातील फरक सरकार भरणार.
    २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजामध्ये सूट. 
    एमएसएमई, शैक्षणिक, गृह, ग्राहक कर्ज, क्रेडीट कार्डवरील कर्ज, वाहन कर्ज. 
    मोरॅटोरियम पर्यायाचा पूर्ण, अंशतः वापर करणारे कर्जधारक पात्र. 
    नियमित कर्ज फेडणारे कर्जधारकही पात्र, त्यांना कॅशबॅक मिळणार. 
    व्याजमाफीमुळे केंद्राच्या तिजोरीवर ६५०० कोटी रुपयांचा बोजा.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com