'सनातन धर्म' हा एड्स-कुष्ठरोग...; उदयनिधीनंतर आणखी एका द्रमुकचे नेत्याचे वादग्रस्त विधान

DMK A Raja: ए. राजा यांनी 'सनातन धर्मा'ची तुलना एड्स, कुष्ठरोगाशी केली.
DMK A Raja Compares Sanatana With AIDS
DMK A Raja Compares Sanatana With AIDSDainik Gomantak

DMK A Raja Compares Sanatana With AIDS: सनातन धर्मावर द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी यांच्यानंतर आता द्रमुकचे ए राजा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ए. राजा यांनी 'सनातन धर्मा'ची तुलना एड्स, कुष्ठरोगाशी केली.

राजा म्हणाले की, 'सनातन धर्मा'ची तुलना एड्स आणि कुष्ठरोग यांसारख्या सामाजिक कलंक असलेल्या रोगांशी केली पाहिजे.

दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजा यांचे हे वक्तव्य आले आहे. उदयनिधींनी 'सनातन धर्मा'ची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती.

अशा गोष्टी संपवल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले होते. यातच आता, ए राजा यांनी उदयनिधींचा बचाव करत हे वक्तव्य केले.

DMK A Raja Compares Sanatana With AIDS
Udayanidhi Stalin: "राहुल गांधी उत्तर भारताचे तर उदयनिधी स्टॅलिन दक्षिण भारताचे पप्पू", भाजप नेत्याची टीका

काय आहे प्रकरण?

तमिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी अतिशय आक्षेपार्ह विधान केले. ते म्हणाले होते की, सनातन धर्म (Sanatan Dharma) हा रोगासारखा आहे. त्यामुळे तो नष्ट करावा.

त्यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. तामिळनाडूमध्ये 'संतनाम निर्मूलन अधिवेशन' आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान ते बोलत होते.

DMK A Raja Compares Sanatana With AIDS
MK Stalin: "हिंदीचे गुलाम बनणार नाही", गृहमंत्री शाह यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा आक्षेप

दरम्यान, उदयनिधींच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते आणि हिंदू संघटनांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. भाजपच्या (BJP) आयटी विभागाचे प्रभारी अमित मालवीय म्हणाले की, द्रमुक नेत्याने सनातन धर्माचे पालन करणाऱ्या 80 टक्के लोकसंख्येच्या “नरसंहारा' ची भाषा केली. मात्र, उदयनिधी यांनी त्यांचा हा आरोप फेटाळून लावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com